आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

11 Stars: कुणी बाप-लेकासोबत तर कुणी कुटुंबातील इतर सदस्यांसोबत केलाय रोमान्स

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टरटेन्मेंट डेस्कः ‘डिअर जिंदगी’ या सिनेमात पूजा भटची बहीण आलिया भट आणि किंग खान शाहरुखने एकत्र काम केले आहे. याचकाळात आलिया आणि तिची बहीण पूजाचा बालपणीचा एक फोटोसुद्धा व्हायरल झाला आहे. हा फोटो ‘चाहत’ या सिनेमाच्या सेटवर क्लिक झाला होता. 1996 मध्ये रिलीज झालेल्या 'चाहत' या सिनेमात पूजा भटने शाहरुख खानसोबत काम केले होता. तर आता 2016 मध्ये आलेल्या 'डिअर जिंदगी' या सिनेमात शाहरुख पूजाच्या धाकट्या बहिणीसोबत काम करताना दिसला.

तसे पाहता, एखाद्या कलाकाराने वेगवेगळ्या सिनेमांत एकाच कुटुंबातील सदस्यांसोबत काम केल्याची ही पहिली वेळ नाहीये. यापूर्वी माधुरी दीक्षितने फिल्म 'दयावान'मध्ये विनोद खन्नासोबत नंतर 'मोहब्बत'मध्ये विनोद खन्नांचा मुलगा अक्षय खन्नासोबत रोमान्स केला होता. बॉलिवूडमध्ये असेही काही अॅक्टर्स आहेत, ज्यांनी सिनेमांत थोरल्या आणि धाकट्या बहिणीसोबत रोमान्स केलाय. या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला अशाच काही अॅक्टर्स-अॅक्ट्रेसेसविषयी सांगत आहोत, ज्यांनी एकाच कुटुंबातील सदस्यांसोबत काम केलंय...
विनोद खन्ना-माधुरी दीक्षित-अक्षय खन्ना
विनोद खन्ना आणि माधुरी दीक्षितने फिल्म 'दयावान'मध्ये एकत्र काम केले होते. या सिनेमातील 'आज फिर तुमपे प्यार आया है' हे गाणे खूप गाजले होते. या गाण्यात माधुरी आणि विनोद खन्ना यांनी बरेच इंटीमेट सीन्ससुद्धा दिले होते. सिनेमात विनोद खन्नाने शक्ती वेलू हे पात्र साकारले होते. तर माधुरी त्याची पत्नी नीलूच्या भूमिकेत झळकली होती.
दुसरीकडे विनोद खन्ना यांचा मुलगा अक्षय खन्ना आणि माधुरी दीक्षित एका सिनेमात रोमान्स करताना दिसले आहेत. 1997मध्ये आलेल्या 'मोहब्बत' या सिनेमात माधुरी आणि अक्षय लीड रोलमध्ये होते. या सिनेमातील 'ओ बेबी डोंट ब्रेक माय हार्ट' हे गाणे खूप हिट झाले होते.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन जाणून घ्या, अशा स्टार्सविषयी ज्यांनी त्यांच्या को-स्टार्सच्या फॅमिली मेंबर्ससोबत केलाय रोमान्स...
बातम्या आणखी आहेत...