आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'सिंघम गर्ल' पासून सुशांतसिंह राजपूतपर्यंत, यांनी बॅकग्राऊंड डान्सर म्हणून सुरू केले करिअर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - बॉलिवूडमध्ये अनेक अॅक्टर अॅक्ट्रेसेस आज प्रसिद्दीच्या शिखरावर आहेत. पण त्यांच्या लाईफमध्ये स्ट्रगलचा एक काळ असाही होता जेव्हा त्यांनी चित्रपटात येण्यासाठी आणि करिअर बनवण्यासाठी बॅकग्राऊंड डान्सर म्हणूनही काम करावे लागले. त्यात सध्याचा आघाडीचा अॅक्टर सुशांतसिंह राजपूत पासून ते 'सिंघम'ची अॅक्ट्रेस काजल अग्रवाल, दिया मिर्झा, फराह खान, सरोज खान, रेमो डिसुजा, शाहीद कपूर, अरशद वारसी, डेझी शाह, नीतू चंद्रा आणि साजीद खान असा अनेक सेलिब्रिटींचा समावेश आहे. 
 
बॅकग्राऊंड डान्सर म्हणून करिअरची सुरुवात करणाऱ्या अशाच काही सेलिब्रिटींबाबत आपण आज माहिती जाणून घेणार आहोत. 

काजल अग्रवाल
'सिंघम' चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये अॅक्ट्रेस म्हणून डेब्यू करणारी काजल अग्रवाल यापूर्वी 2004 मध्ये आलेल्या 'क्यों हो गया ना' चित्रपटाच्या 'उलझनें' गाण्यात ऐश्वर्याबरोबर झळकली होती. पण या गाण्यात ती बॅकग्राऊंड डान्सर होती, त्यामुळे कोणाच्याही लक्षातही आली नाही. 
 
दिया मिर्झा 
मिस एशिया पॅसिफिक राहिलेली दिया मिर्झा 1999 मध्ये आलेला दाक्षिणात्य चित्रपट 'एन स्वासा कात्रे' मधील एका गाण्यात ती बॅकग्राऊंड डान्सर म्हणून झळकली होती. या गाण्यात तिच्याबरोबर अॅक्ट्रेस मिंक बरारही होती. दियाने 2001 मध्ये 'रहना है तेरे दिल में' मध्ये अॅक्ट्रेस म्हणून डेब्यू केला होता. 
 
 
बॅकग्राऊंड डान्सर म्हणून करिअरची सुरुवात करणाऱ्या अशाच काही सेलिब्रिटींबाबत जाणून घेऊयात पुढील स्लाइड्सवर..
 
बातम्या आणखी आहेत...