आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bollywood Stars With Same Age But Different Career

Same Ageचे आहेत हे बॉलिवूड सेलेब्स, कुणी हिट तर कुणी फ्लॉप

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(बॉलिवूड अभिनेत्री नंदना सेन आणि माधूरी दीक्षित)
बॉलिवूड अभिनेत्री नंदना सेनचा जन्म 19 ऑगस्ट 1967 रोजी कोलकात्यात झाला. तिने सिनेमा दिग्दर्शनाचे शिक्षण यूएसी फिल्म स्कूल मधून केले आणि अभिनयाचे शिक्षण स्ट्रॉस्बर्ग थिएटर इंस्टीट्यूट, न्यूयॉर्कमधून पूर्ण केले. शिक्षण पूर्ण केल्यानंतर तिने अभिनया क्षेत्रात पाऊल ठेवले. तिथे तिने बॉलिवूड, हॉलिवूडसोबत इटालिअन सिनेमांत काम केले. बॉलिवूडमध्ये काम करूनदेखील तिला यश मिळाले नाही. मात्र तिच्याच वयाच्या अनेक अभिनेत्री या क्षेत्रात यश मिळवण्यात यशस्वी ठरल्या. बॉलिवूडमध्ये असे अनेक सेलेब्स आहेत, ज्यांचे वय सारखेच मात्र त्यामधील कुणी हिट तर कुणी फ्लॉप आहे.
सेलेब्सचे वय जसे-जसे वाढते, तशीच त्यांची लोकप्रियता कमी होत जाते. परंतु असे अनेक स्टार्स आहेत, ज्यांची डिमांड त्यांच्या वाढत्या वयासोबत कमी झालेली नाहीये. आजसुध्दा बी-टाऊनमध्ये अनेक स्टार्स आहेत, जे वाढत्या वयातसुध्दा सिनेमांत मुख्य भूमिका साकारत आहेत. प्रेक्षकांना आकर्षित करण्यात त्यांना यश मिळत आहे. तसेच त्यांच्याच वयाच्या काही स्टार्सनी खूप दिवसांपूर्वीच रुपेरी पडद्याला राम-राम ठोकला.
नंदना सेन आणि माधूरी दीक्षित-
दोघींचा जन्म 1967मध्ये झाला. 'अबोध' सिनेमांतून बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवणारी माधूरी दीक्षित सध्या बी-टाऊनच्या टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे. उत्कृष्ट अभिनय आणि शानदार डान्सिंग मूव्हच्या बळावर तिने प्रेक्षकांची मने जिंकली. दुसरीकडे नंदना सेनच्या करिअरचा आलेख काही खास राहिला नाही. तिने पडद्यावर बोल्ड भूमिकासुध्दा साकारल्या. परंतु तरीदेखील तिला यश मिळाले नाही.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या कोण-कोणते स्टार्स आहेत एकाच वयाचे...