आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॉलिवूडच्या झगमगाटापासून लांब राहतात बॉबी, फरदीनसह या 21 फिल्म स्टार्सच्या Better Half

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्कः बॉलिवूडमध्ये असे अनेक स्टार्स आहेत, ज्यांच्या खासगी आयुष्याविषयी लोकांना ब-याच गोष्टी ठाऊक असतात, मात्र त्यांच्या पत्नींविषयी फारसे काही माहित नाही. बॉलिवूडच्या अनेक अभिनेत्यांनी सर्वसामान्य तरुणींची जोडीदाराच्या रुपात निवड केली आहे. या अभिनेत्यांच्या पत्नी लग्नापूर्वीच नाही तर लग्नानंतरसुद्धा सिनेसृष्टीपासून कायम दूर राहिल्या आहेत. अलीकडेच अभिनेता बॉबी देओल पत्नी तान्यासोबत अभिनेता फरदीन खानच्या बर्थडे पार्टीत पोहोचला होता. तान्या देओल अशा स्टार्स वाईफपैकी एक आहे, जी बॉलिवूडच्या झगमगाटापासून कायम दूर राहते. 
 
बॉलिवूडमध्ये बॉबी देओलसोबतच आर. माधवन, सोनू सूद आणि सोहेल खानसह असे अनेक अभिनेते आहेत, जे सिनेसृष्टीत अॅक्टिव आहेत, मात्र त्यांच्या पत्नी कधीच लाइमलाइटमध्ये येत नाहीत. या पॅकेजमधून जाणून घेऊयात या स्टार्स वाइफविषयी...

तान्या देओल
पती - बॉबी देओल 

वडील धर्मेंद्र आणि भाऊ सनीच्या पत्नींप्रमाणेच बॉलिवूड अभिनेता बॉबी देओलची पत्नी तान्याचे नावसुद्धा फार कमी लोकांना ठाऊक आहे. बॉबीने १९९६ मध्ये तान्यासोबत लग्न केले होते. या दाम्पत्याला आर्यमान आणि धरम ही दोन मुले आहेत.

नताशा खान
पती - फरदीन खान 

नताशा गत काळातील एका प्रसिध्द अभिनेत्री मुमताजची मुलगी आहे, परंतु तिचा बॉलिवूडशी काहीच नातं नाहीये. तिने फरदिन खानसोबत 2005मध्ये लग्न केले होते. आजसुध्दा नताशा एक गृहिणी आहे. डिसेंबर 2013मध्ये यांना एक मुलगी झाली आहे.

पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या लाइमलाइटपासून दूर राहणा-या आणखी काही अभिनेत्यांच्या पत्नींविषयी...

(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
 
बातम्या आणखी आहेत...