आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकेकाळी मुंबईत राहायला नव्हते छत, बी टाऊनच्या 24 वर्षांच्या प्रवासातील शाहरुखचे Rare Pics

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शाहरुखची इंडस्ट्रीतील पदार्पणानंतरची अतिशय जुनी छायाचित्रे - Divya Marathi
शाहरुखची इंडस्ट्रीतील पदार्पणानंतरची अतिशय जुनी छायाचित्रे
एन्टरटेन्मेंट डेस्कः बॉलिवूडचा किंग अर्थातच अभिनेता शाहरुख खानला फिल्म इंडस्ट्रीत आज 24 वर्षे पूर्ण झाली आहेत. त्याचा पहिला सिनेमा 'दीवाना' हा आजच्या दिवशी म्हणजे 25 जून 1992 रोजी रिलीज झाला होता. सुपरहिट ठरलेल्या या सिनेमात शाहरुख खानने दिव्या भारती आणि ऋषी कपूर यांच्यासोबत स्क्रिन शेअर केली होती. या सिनेमाला मिळालेल्या यशानंतर शाहरुखने कधीही मागे वळून पाहिले नाही.
अनेक हिट सिनेमे देऊन तो बॉलिवूडचा बादशाह बनला. मात्र त्याला हे यश सहजासहजी मिळालेले नाही. इंडस्ट्रीत स्थिरावण्यासाठी त्याला बराच संघर्ष करावा लागला आहे. त्याचा संघर्ष चाहत्यांपासून लपलेला नाहीये. आज बॉलिवूडमध्ये किंग खान नावाने प्रसिद्ध असेलल्या शाहरुखकडे एकेकाळी मुंबईत राहायला घरसुद्धा नव्हते.

रेल्वे प्लॅटफॉर्मवर काढावे लागले होते दिवस...
सुरुवातीच्या काळात राहायला घर नसल्याने त्याने रेल्वे प्लॅटफॉर्मवर दिवस काढले. त्यानंतर निर्माता आणि अभिनेता विवेक वासवानी यांच्या घरी भाड्याने जागा घेतली. शाहरुखने बराच काळ त्यांच्या घरी काढला. इतकेच नाही तर विवेकने एका मीडिया हाऊसला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते, "खूप दिवस झाल्याने मी शाहरुखला घराबाहेर काढण्याचा प्रयत्न केला होता. मात्र तो अपयशी ठरला."
'दिवाना' नव्हे 'दिल आशना है' पहिला सिनेमा
इंडस्ट्रीत पदार्पण करताना शाहरुखचा येथे कुणीही गॉडफादर नव्हता. शिवाय त्याच्या घरात सिनेमांची पार्श्वभूमीसुद्धा नव्हती. शाहरुखने दूरदर्शनवरील 'फौजी' आणि 'सर्कस' या मालिकांमधून प्रेक्षकांच्या मनात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले. त्यानंतर तो सिनेमांकडे वळला. शाहरुखला सुरुवातीच्या काळात विवेक वासवानी आणि अजीज मिर्झा हे मित्र मिळाले. हा तो काळ होता, जेव्हा शाहरुख बॉलिवूडमधला नवीन चेहरा होता. याच काळात हेमा मालिनी आपल्या 'दिल आशना है' या सिनेमासाठी दिव्या भारतीच्या अपोझिट एका नवीन चेह-याच्या शोधात होत्या. विवेक शाहरुखला निर्माता-दिग्दर्शकांची भेट घ्यायला सोबत घेऊन जात असते. त्यांनीच शाहरुखला या सिनेमाविषयी सांगितले. शाहरुखची निवड या सिनेमासाठी झाली. मात्र या सिनेमापूर्वी 'दीवाना' हा सिनेमा रिलीज झाला.
'दीवाना' बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला. शाहरुख इंडस्ट्रीत प्रसिद्धीझोतात आला. त्याने बॉलिवूडमध्ये नवीन ट्रेंड आणला आणि अँटी हीरोची प्रतिमा निर्माण केली. त्यानंतर त्याचा 'दिल आशना है' हा सिनेमा रिलीज झाला. मात्र सिनेमा फ्लॉप ठरला. मात्र त्यानंतर आलेल्या 'बाजीगर' आणि 'डर' या सिनेमांनी शाहरुखचे करिअर यशोशिखरावर पोहोचवले.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, शाहरुख खानची बॉलिवूड प्रवासातील अतिशय दुर्मिळ छायाचित्रे.. ही छायाचित्रे क्वतिचत तुम्ही पाहिली असावीत...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...