आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Tanuja @72! If You Think Where Kajol Gets Her Attitude From, Then This Is The Answer

तनुजा @72! एकेकाळची ही बोल्ड आणि बिनधास्त अभिनेत्री आजही ओढते सिगारेट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अभिनेत्री तनुजा हे केवळ हिंदीतीलच नव्हे तर मराठी फिल्म इंडस्ट्रीतील प्रसिद्ध नाव आहे. 60 आणि 70 च्या दशकात त्यांच्या अभिनयाची जादू काही वेगळीच होती. 'बहारें फिर भी आयेंगी', 'ज्वेल थीफ', 'हाथी मेरे साथी', 'अनुभव', 'जीने की राह' यांसह असंख्य सिनेमांमध्ये त्यांनी आपल्या अभिनयाची जादू दाखवली. तनुजा यांना त्यांच्या बोल्ड आणि बिनधास्त इमेजसाठीही ओळखले जायचे. ज्या काळात अभिनेत्रींना अगदी ट्रेडिशनल रुपमध्ये बघायची लोकांना सवय होती, त्याकाळात तनुजा बिनधास्तपणे वावरत होत्या. टॉम बॉईश म्हणून त्यांची ओळख होती. पार्टीजमध्ये सिगारेट ओढणे, दारु पिणे हे त्यांच्यासाठी अगदी सर्वसामान्य बाब होती. पडद्यावरही अनेकदा त्यांची बोल्ड इमेज बघायला मिळाली आहे. आजही त्या सार्वजनिक ठिकाणी सिगारेट ओढताना दिसतात.
तनुजा यांना अभिनयाचे बाळकडू आई शोभना समर्थ यांच्याकडून मिळाले आहेत. त्यांनी हाच वारसा आपल्या पुढच्या पिढीला अर्थातच आपल्या लेकींना दिला आहे. त्यांची थोरली लेक काजोल हिंदी सिनेसृष्टीतील नावाजलेली अभिनेत्री आहे, तर धाकटी लेक तनिषा मुखर्जीसुद्धा अभिनय क्षेत्रात आहे.
वयाची 72 वर्षे पूर्ण करणा-या तनुजा यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने छायाचित्रांच्या माध्यमातून त्यांच्या भूतकाळात डोकावून पाहुयात.
पुढे पाहा, तनुजा यांची क्वचितच बघण्यात आलेली जुनी छायाचित्रे...