आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'बिल्ला' नावाने प्रसिद्ध झाला होता हा व्हिलन, कसा झाला मृत्यू ते अजूनही आहे कोडे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - हिंदी चित्रपटांमध्ये एक काळ असा होता जेव्हा अॅक्शन चित्रपटांना फारच मागणी असे. त्यामुळे निर्माता दिग्दर्शकही त्यांच्या चित्रपटात अॅक्शनचा भरपूर मालमसाला टाकत असत. आता अॅक्शन चित्रपट म्हटल्यावर त्यासाठी व्हिलेन असणेही साहजिकच आहे. त्यामुळे जेवढी हिरोटी चित्रपटात डिमांड होती तेवढीत व्हिलनलाही होती. 

त्या काळात असाच एक व्हिलन होता जो आपल्याला बऱ्याच चित्रपटात दिसत असे पण त्याचे नाव आपल्याला नक्कीच माहीत नसेल. त्या व्हिलनचे नाव होते मानिक इराणी. केवळ नावाने या व्हिलनला ओळखणारे तसे फार कमी असतील पण फोटो पाहून कोणीही त्या व्हिलनला बिल्ला संबोधल्याशिवाय राहणार नाही. 

सुभाष घई यांच्या 'हीरो' चित्रपटातील बिल्लाच्या भूमिकेमुळे त्यांचे हेच नाव सगळीकडे प्रसिद्ध झाले होते. माणिक यांनी याअगोदरही अनेक चित्रपटात व्हिनलची भूमिका केली होती पण त्यांना ओळख हिरो या चित्रपटातून भेटली. माणिक हे त्याचा वेगळा लुक्स आणि शरीरयष्टीने ओळखले जात होते. माणिक यांना पाहून कोणालाही भीती वाटेल असेच ते दिसत. माणिक यांची डॉयलॉग डिलीव्हरीही वेगळीच असे त्यामुळे ते त्यांच्या अभिनयात जीव टाकत. 
 
बिलाला जेव्हाही स्क्रिनवर येत असत एक वेगळीच दहशत लोकांच्या मनामध्ये असे. माणिक यांनी 1974 साली गुंडाच्या भूमिकेने फिल्मी करीअरची सुरुवात केली होती. त्यांनी 'कालीचरण', 'त्रिशूल', 'मिस्टर नटवरलाल', 'शान', 'कसम पैदा करनेवाले की' यांसारख्या चित्रपटात काम केले होते. 'कालीचरण' चित्रपटात माणिक यांनी मुक्या व्हिलनची भूमिका केली होती ती भूमिका प्रेक्षकांच्या चांगल्याच लक्षात राहिली. 
 
80 आणि 90 च्या शतकात माणिक यांनी व्हिलन म्हणून प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले पण त्यानंतर दारुच्या आहारी गेल्याने त्यांनी लवकरच जगाला अलविदा केला. माणिक यांचा मृत्यू कसा झाला याबद्दल कोणालाच फारशी माहिती नाही पण बऱ्याच जणांनी सांगितल्यानुसार, त्यांचा मृत्यू दारुच्या अतिसेवनाने झाला. 
 
पुढच्या स्लाईडवर पाहा, माणिक इराणी यांचे काही खास PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...