आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

20व्या वर्षी 36 वर्षाच्या महिलेसोबत झाले होते नसीर यांचे लग्न, शाहिदची मावशी आहे दुसरी पत्नी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्कः बॉलिवूड अभिनेते नसीरुद्दीन शाह यांचे नाव उच्चारताच एका साध्या आणि आकर्षक व्यक्तिमत्वाचे चित्र डोळ्यासमोर उभे राहते. त्यांचा चेहरा जरी असाधारण असला तरी प्रतिमा मात्र अतुलनीय आहे. हिंदी सिनेमांमध्ये त्यांचे योगदान वाखण्याजोगे आहे. नसीरुद्दीन लवकरच वयाची 66 वर्षे पूर्ण करणार आहेत. नसीरुद्दीन शाह यांचा जन्म उत्तरप्रदेशच्या बाराबंकीमध्ये 20 जुलै 1963 रोजी झाला. मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या नसीर यांनी अलीगढ विद्यापीठातून आपले शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये प्रवेश घेतला. अभिनयाचे धडे घेतल्यानंतर नसीर यांनी हिंदी सिनेमाकडे आपला मोर्चा वळवला.
आपल्यापेक्षा वयाने 16 वर्षे मोठ्या महिलेसोबत केले होते पहिले लग्न..
नसीरुद्दीन शाह यांचे फिल्मी जीवन यशस्वी राहिले आहे. परंतु खासगी आयुष्यात अनेक समस्यांना त्यांना सामारे जावे लागले. नसीर यांचे पहिले लग्न अपयशी ठरले होते. वयाच्या 20 व्या वर्षी नसीर यांनी त्यांच्यापेक्षा वयाने 16 वर्षे मोठ्या असलेल्या मनारा सीकरीसोबत लग्न केले होते. मात्र लग्नाच्या काही दिवसांनी दोघांमध्ये मतभेद निर्माण झाले. या दाम्पत्याला एक मुलगीसुद्धा झाली. हिबा हे तिचे नाव. विशेष म्हणझे नसीर यांच्यापूर्वी मनारा यांचे पहिले लग्न झाले होते. नसीर यांच्यासोबत त्यांनी दुसरे लग्न केले होते. लग्नाच्या 12 वर्षांनी नसीर आणि मनारा यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला आणि मनारा मुलगी हिबाला घेऊन इराणला निघून गेल्या. इराणमध्येच 1990 मध्ये त्यांचे निधन झाले.
मनारा नसीर यांच्या आयुष्यातून निघून गेल्यानंतर 80च्या दशकात रत्ना पाठक यांची एन्ट्री नसीर यांच्या आयुष्यात झाली. रत्ना या गुजरातच्या प्रसिध्द अभिनेत्री दीना पाठक यांच्या कन्या आहेत. गुजरातचे जावई बनलेले नसीर दुस-या लग्नाच्या वेळी 13 वर्षांच्या मुलीचे वडील होते.
पुढे वाचा, कशी सुरु झाली होती नसीरुद्दीन आणि रत्ना यांची लव्ह स्टोरी...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...