आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bollywood Wives Who Are Older Than Their Husbands

25चा आयुष तर 26ची अर्पिता, या बॉलिवूड पत्नीसुध्दा पतीपेक्षा वयाने आहेत मोठ्या

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डावीकडून अर्पिता खान शर्मा, आयुष शर्मा, अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन
 
मुंबई- सुपरस्टार सलमान खानची धाकटी बहीण अर्पिता खान आणि आयुष शर्माच्या लग्नाचा एक वर्षे पूर्ण झाले आहे. त्यांचे लग्न 18 नोव्हेंबर 2014ला हैदराबादच्या पंचतारांकित फलकनुमा पॅलेसमध्ये झाले होते. लग्नानंतर मीडियामध्ये बातमी आली होती, की आर्पिता आयुषपेक्षा मोठी आहे. मात्र ती किती वर्षांनी मोठी आहे, याचा अद्याप खुलासा झालेला नाहीये. यावर्षी 26 ऑक्टोबरला आयुषने 25वा वाढदिवस साजरा केला. स्वत: अर्पिताने त्याच्या बर्थडेला टि्वट करून एक फोटो शेअर केला होता. 
 
फोटोखाली लिहिले होते, \"#hubbybday#25th#celebration#friendslikefamily#360#sunsetbythewater#funtimes#chilling#greatcompany @aaysharma\"
 
26 वर्षांची आहे अर्पिता- 
इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, अर्पिताचे वय 26 वर्षे आहे. 1981मध्ये सलीम खान यांनी बॉलिवूड अभिनेत्री हेलनसोबत लग्न केले होते. त्यानंतर दोघांनी अर्पिताला दत्तक घेतले. इंटरनेटवर अर्पिताची जन्मतारीख 1 ऑगस्ट 1989 आहे. यानुसार, ती आयुषपेक्षा एक वर्षांनी मोठी आहे.      
 
अर्पिता-आयुषशिवाय बॉलिवूडमध्ये अनेक कपल्स आहेत, ज्यामध्ये पत्नी पतीपेक्षा वयाने मोठ्या आहेत. यामधील काहींचे वैवाहिक आयुष्य यशस्वी आहे तर काहींचे अपयशी ठरले. चला एक नजर टाकूया या कपल्सवर... 
 
अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन पती अभिषेकपेक्षा वयाने जवळजवळ अडीच वर्षांनी मोठी आहे.
अभिषेक बच्चन, 39
जन्म- 5 फेब्रुवारी 1976
ऐश्वर्या राय बच्चन, 41
जन्म- 1 नोव्हेंबर, 1973
लग्न- एप्रिल 2007
 
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या बॉलिवूडमध्ये कोण-कोणत्या पत्नी पतीपेक्षा वयाने मोठ्या आहेत...