आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bollywood's Popular Actresses Who Married To Other Religion.

करीना खान, जेनेलिया बनली देशमुख, या अभिनेत्रींनी केले दुस-या धर्मात लग्न

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो : करीना कपूर खान आणि सैफ अली खान, जेनेलिया देशमुख आणि रितेश देशमुख)
मुंबई- बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान 35 वर्षांची झाली आहे. 21 सप्टेंबर 1980ला मुंबईमध्ये रणधीर कपूर आणि अभिनेत्री बबीता यांच्या घरी जन्मलेल्या करीनाने 2000मध्ये दिग्दर्शक जे पी दत्ता यांच्या 'रिफ्यूजी' सिनेमातून बॉलिवू़डमध्ये एंट्री केली. मात्र हा सिनेमा फ्लॉप ठरला, परंतु करीनाच्या अभिनयाची प्रशंसा झाली. त्यानंतर तिने 'कभी खुशी कभी गम', 'चमेली', ' ओंकारा', 'बॉडीगार्ड' 'हीरोइन' आणि 'बजरंगी भाईजान'सारखे अनेक सुपरहिट सिनेमे केले. आज करीना बॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये सामील आहे.
दुस-या धर्मात केले लग्न-
करीनाने 2012मध्ये वेगळ्या धर्माचा अभिनेता सैफ अली खानसोबत लग्न केले. तसेच पाहता वेगळ्या धर्मात लग्न करणारी करीना पहिली अभिनेत्री नाहीये. बॉलिवूडच्या अनेक अभिनेत्रींनी प्रेमासाठी धर्माच्या भिंती ओलांडल्या.
ख्रिश्चन जेनेलिया डिसूजा बनली हिंदू कुटुंबाची सून-
अभिनेत्री जेनेलियाचा जन्म मुंबईमधील एका ख्रिश्चन कुटुंबात झाला. 2012मध्ये तिने हिंदु धर्म असलेल्या रितेश देशमुखसोबत लग्न केले. रितेश महाराष्ट्राचे दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा मुलगा आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या अशाच काही अभिनेत्रींविषयी...