आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bollywood’s Adorable Couples Who Have Been Married For The Longest Time

हे आहेत इंडस्ट्रीतील यशस्वी कपल्स, कुणी 49 तर कुणी 34 वर्षांपासून निभावत आहेत एकमेकांची साथ!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमिताभ बच्चन आणि जया बच्चन - Divya Marathi
अमिताभ बच्चन आणि जया बच्चन
मुंबई : असं म्हणतात की, जोड्या स्वर्गात बनतात… ही गोष्ट बॉलिवूडच्या काही सेलिब्रिटींवरसुद्धा फिट बसते. खरं तर बॉलिवूडमधून पॅचअपपेक्षा ब्रेकअपच्या बातम्या कानांवर पडत असतात. मात्र इंडस्ट्रीत काही जोड्या अशा आहेत, ज्या लग्नगाठीत अडकल्यापासून सोबत आहेत. अनेकदा या जोड्यांच्याही ब्रेकअपच्या बातम्या मीडियात आल्या, मात्र या जोड्यांनी आपल्या नात्याला कधीही तडा जाऊ दिला नाही. या जोड्यांमध्ये अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांचा प्रामुख्याने उल्लेख केला जातो.

अमिताभ यांच्या अफेअर्सच्या अफवांकडे जया यांनी दिले नाही लक्ष…
अमिताभ बच्चन आणि जया यांचे 1973मध्ये लग्न झाले. त्याकाळी जया बच्चन इंडस्ट्रीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक होत्या. बिग बींसह लग्न झाल्यानंतर त्यांनी फिल्मी दुनियेला जवळपास रामराम ठोकला होता. याकाळात बिग बींच्या अफेअरच्या बातम्या मीडियात चर्चेत होत्या. मात्र बिग बींच्या प्रामाणिकपणामुळे जया यांनी सर्व अफवांकडे दुर्लक्ष केले. या अफवांना पूर्णविराम लावण्यासाठी जया यांनी बिग बींना पूर्ण साथ दिली. 3 जून 1973 रोजी हे कपल लग्नाच्या बेडीत अडकले. गेल्या 42 वर्षांपासून हे दाम्पत्य सुखी वैवाहिक आयुष्य व्यतित करत आहे.
पुढील स्लाईड्समध्ये वाचा, शाहरुख-गौरी, धर्मेंद्र-हेमामालिनीपासून ते अजय-काजोलपर्यंत का खास आहे या सेलिब्रिटींचे लग्न...