आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'बजरंगी...'च्या हर्षालीनंतर आता ही चिमुरडी लावणार प्रेक्षकांना लळा, जाणून घ्या हिच्याविषयी...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'बजरंगी भाईजान' या सिनेमात झळकलेल्या हर्षाली मल्होत्राने आपल्या निरागस अभिनयाने प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला आहे. सिनेमात एक शब्दही न बोलता हर्षालीने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. आता हर्षालीनंतर आणखी एक चिमुरडी प्रेक्षकांना लळा लावण्यासाठी येत आहे. या चिमुरडीचे नाव आहे नायशा खन्ना. सहा वर्षीय नायशा लवकरच अक्षय कुमार आणि जॅकलिन फर्नांडिस स्टारर 'ब्रदर्स' या सिनेमात झळकणार आहे. गालावरील खळी आणि स्मितहास्याने या चिमुकलीने अक्षय आणि जॅकलिनला आधीच लळा लावला आहे. या सिनेमात तिने जॅकलिन आणि अक्षयच्या मुलीची भूमिका साकारली आहे.
'ब्रदर्स'द्वारे मोठ्या पडद्यावर एन्ट्री
'ब्रदर्स' या सिनेमाद्वारे नायशा मोठ्या पडद्यावर पदार्पण करत आहे. मात्र या सिनेमाच्या निमित्ताने तिने पहिल्यांदाच कॅमेरा फेस केला, असे नाहीये. यापूर्वी नायशा ब-याच जाहिराती आणि मालिकांमध्ये झळकली आहे. बँक ऑफ इंडिया, एलआयसीच्या जाहिरातीमध्ये झळकली आहे. याशिवाय 'सपने सुहाने लड़कपन के' आणि 'बेस्ट ऑफ लक निकी' या शोजमध्येही तिने आपल्या अभिनयाचा जलवा दाखवला आहे.
कशी मिळाली 'ब्रदर्स'ची ऑफर
नायशाच्या आईने एका मुलाखतीत सांगितले, ''नायशाने अभिनयात प्रवेश करायला हवा, असा सल्ला मला माझ्या एका मैत्रिणीने दिला. त्यानंतर विचार करुन आम्ही प्रयत्न केले आणि नायशाला जाहिराची ऑफर मिळाली. त्यानंतर तिच्याकडे जाहिराती आणि मालिकांची रांग लागली. मात्र काही शोज केल्यानंतर नवीन काम स्वीकारायेच नाही, असे आम्ही ठरवले. कारण एवढे काम नायशाच्या वय आणि तब्येतीला न झेपणारे होते.''
पुढे नायशाच्या आईने सांगितले, "हळूहळू ती शूटिंगपासून कंटाळली. त्यामुळे मध्ये आम्ही ब्रेक घेतला. आठ महिन्यांच्या ब्रेकनंतर नायशाला घेऊन आम्ही धर्मा प्रॉडक्शनकडे लूक टेस्टसाठी गेलो आणि तिला या सिनेमासाठी फायनल करण्यात आले."
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, क्यूट नायशाची खास छायाचित्रे...