आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Boy Watched Beautiful Aishwarya And She Unaware.

स्वत:च्या सौंदर्याविषयी अनभिज्ञ होती ऐश्वर्या, तरुण टक लावून न्याहाळत राहायचे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ऐश्वर्या राय बच्चनला आज जगातील प्रत्येक व्यक्ती ओळखते. ती विश्वसुंदरी होणार हे तिच्या नशीबात लिहिलेले होते. ऐश्वर्या पहिली भारतीय महिला होती जिने मिस वर्ल्ड स्पर्धेमध्ये पुरस्कार जिंकून देशाचे नाव उंचावले होते. ऐश्वर्याने मिस वर्ल्ड बनल्यानंतर सिनेमांमध्ये एंट्री केली आणि लोकांची एक मॉडेल एक उत्कृष्ट अभिनेत्री होऊ शकत नाही, ही मानसिकता बदलून टाकली. तिने फिल्मी करिअरची सुरूवात 'इरुवर' या तामिळ सिनेमाने केली.
1997मध्ये आलेला हा सिनेमा मणिरत्नम यांनी दिग्दर्शित केलेला होता. बॉलिवूडमध्ये तिने 'और प्यार हो गया' सिनेमामधून पदार्पण केले. परंतु संजय लिला भन्साळी यांच्या 'हम दिल दे चुके सनम' या सिनेमातून तिच्या सौंदर्याने लोकांना भूरळ घातली. ऐश्वर्याचा हा सिनेमा सुपरहिट ठरला. त्यानंतर तिने एकापाठोपाठ अनेक सुपरहिट सिनेमे दिले. 'देवदास', 'धूम 2', 'ताल' आणि 'जोधा अकबर' या सिनेमांनी तिला जगभरात प्रसिध्दी मिळवून दिली.
एकेकाळी ऐश्वर्याला रायला कुणी बघितले तर तिला वाटत होते, की तिनेच कोणता गुन्हा केला आहे. कारण तिला तिच्या सौंदर्याची जाणच नव्हती. तिला कधीच वाटत नव्हते ती इतकी सुंदर आहे. शालेय जीवनातसुध्दा ती लोकांच्या नजरा चुकत होती. असेही सांगितले जाते, की ऐश्वर्या तिच्या शालेय जीवनात सांस्कृतिक कार्यक्रमांपासून नेहमीच दूर राहत होती. लोक तिच्याकडे आकर्षित होऊ नये हे एकमेव कारण त्यामागे होते.
शाळेत ऐश्वर्याला तिचे शिक्षक नाटकात परीच्या पात्रासाठी तिला बोलवत होते परंतु ती नेहमीच नकार देत होती. तिला भिती वाटायची, की शाळेतील मुले तिच्या मागे लागले तर किंवा त्यांनी तिला शाळेच्या बाहेर त्रास दिला तर...?
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून वाचा ऐश्वर्याविषयी अशाच काही रंजक गोष्टी...