आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोनमच्या बॉयफ्रेंडने जाहीर केले प्रेम, 'कान'मधील एका फोटोवर फिदा झाला आनंद

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - सोनम कपूर तिच्या स्टाईलचा जलवा कान फिल्म फेस्टीव्हलमध्ये उधळत आहे. तिचे विविध लुक पाहुन तिचे चाहते खूश झाले आहेत त्यात तिचा तथाकथित बॉयफ्रेंड आनंद अहुजाचाही समावेश आहे. 
 
सोनम कपूरची बहीण रिहाने सोनमचा एक फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. ब्लॅक अॅण्ड व्हाईट फोटोत सोनम गाडीत बसलेली दिसून येत आहे. रिहाने या फोटोसोबत  'I Love this picture' असे कॅप्शन दिले आहे. तर याच फोटोवर आनंदने 'looveeee' असे कमेंट केले आहे. 
एवढेच नाही, सोनमचा एक फोटो आनंदने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. त्या फोटोला सोनमने अनेक हार्ट इमोजी कमेंटमध्ये दिले आहेत. 
 
आतापर्यंत सोनमने अथवा आनंदने त्यांच्या नात्याबद्दल काहीही खुलासा केलेला नाही. विशेष म्हणजे नीरजा चित्रपटासाठी सोनमला जेव्हा राष्ट्रीय  पुरस्कार दिला गेला तेव्हा आनंदही तिच्यासोबत उपस्थित होता. 
 
पुढच्या स्लाईडवर जाणून घ्या, कोण आहे आनंद अहुजा..
बातम्या आणखी आहेत...