आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ही आहे ब्रम्हानंदम यांची फॅमिली, भेटा साऊथच्या फेमस स्टार्सच्या फॅमिलीला आणि बघा Photos

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पत्नी लक्ष्मी कन्नेगंतीसोबत ब्रम्हानंदम, उजवीकडे - वर थोरला मुलगा राजा गौतम आणि सून ज्योत्सना, खाली - धाकटा मुलगा सिद्धार्थसोबत ब्रम्हानंदम. - Divya Marathi
पत्नी लक्ष्मी कन्नेगंतीसोबत ब्रम्हानंदम, उजवीकडे - वर थोरला मुलगा राजा गौतम आणि सून ज्योत्सना, खाली - धाकटा मुलगा सिद्धार्थसोबत ब्रम्हानंदम.
एन्टरटेन्मेंट डेस्कः दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील प्रसिद्ध विनोदवीर ब्रम्हानंदम यांनी वयाची 61 वर्षे पू्र्ण केली आहेत. 1 फेब्रुवारी 1956 रोजी आंध्रप्रदेशातील  साटेनापल्ली जिल्ह्यातील मुपल्ला गावात जन्मलेल्या ब्रम्हानंदम यांचे बालपण अतिशय हलाखीच्या परिस्थितीत गेले होते. ते त्यांच्या कुटुंबातील एकमेव असे सदस्य आहेत, ज्यांनी एम.ए पर्यंत शिक्षण घेतले. पोस्ट ग्रॅज्युएशननंतर त्यांनी तेलगु लेक्चरर म्हणून अत्तिल्ली कॉलेजमध्ये नोकरी सुरु केली होती.  
कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना आपल्या मिमिक्रीने हसवणा-या ब्रम्हानंदम यांना एकदा इंटर कॉलेज ड्रामा कॉम्पिटीशनमध्ये बेस्ट सपोर्टिंग आर्टिस्टचा पुरस्कार मिळाला. त्यानंतर त्यांची ड्रामाकडे रुची वाढली. त्याचकाळात प्रसिद्ध तेलगु डायरेक्टर जन्धयाला यांनी ब्रह्मानंदम यांचा 'मोद्दाबाई' नावाच्या नाटकातील अभिनय बघून  आपल्या 'चन्ताबाबाई' या सिनेमात भूमिका ऑफर केली. त्यानंतर ब्रम्हानंदम यांनी मागे वळून पाहिले नाही. 

ब्रम्हानंदम यांना आहेत दोन मुले...
ब्रम्हानंदम यांच्या सिनेमांविषयी लोकांना बरेच काही ठाऊक आहे, मात्र त्यांच्या कुटुंबाविषयी लोकांना फारसे काही ठाऊक नाही. ब्रम्हानंदम  यांच्या पत्नीचे नाव लक्ष्मी कन्नेगंती आहे. या दाम्पत्याला दोन मुले आहेत. थोरल्या मुलाचे नाव राजा गौतम तर धाकट्याचे नाव सिद्धार्थ आहे. राजा गौतमने 2004 मध्ये 'पल्लाकिलो पेल्लि कुटुरु' या सिनेमातून रुपेरी पडद्यावर पदार्पण केले होते.   

ब्रम्हानंदम यांच्या मुलाचे झाले आहे सिनेमेटोग्राफरच्या मुलीसोबत लग्न...
ब्रम्हानंदम यांचा थोरला मुलगा राजा गौतमचे 24 ऑक्टोबर, 2012 रोजी सिनेमेटोग्राफर श्रीनिवास रेड्डी यांची मुलगी ज्योत्सनासोबत लग्न झाले.   

पुढील स्लाईड्समध्ये बघा, साऊथच्या प्रसिद्ध अॅक्टर्सचे Family फोटोज...
बातम्या आणखी आहेत...