आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B'day: ओळखा पाहू कोण? ही चिमुकली आज आहे प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शकाची पत्नी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टरटेन्मेंट डेस्कः वर छायाचित्रात दिसणा-या चिमुकलीला तुम्ही ओळखलंत का? नाही... चला तर मग आम्हीच तुम्हाला सांगतो ही आहे तरी कोण. ही आहे बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री राणी मुखर्जी. राणीचा आज वाढदिवस असून तिने आपल्या वयाची 38 वर्षे पूर्ण केली आहेत. 21 मार्च 1978 रोजी मुंबईत राणीचा जन्म झाला. तिने आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात 1992 साली रिलीज झालेल्या 'बियेर फूल' या बंगाली सिनेमात सहाय्यक अभिनेत्रीच्या रुपात केली होती. तर 1997 मध्ये आलेल्या 'राजा की आयेगी बारात' या सिनेमाद्वारे बी टाऊनमध्ये एन्ट्री घेतली. कुछ कुछ होता है, कभी खुशी कभी गम, मुझसे दोस्ती करोगे, साथिया, नो वन किल्ड जेसिका हे हिट सिनेमे राणीच्या नावावर जमा आहेत.

राणी प्रसिद्ध चोप्रा घराण्याची थोरली सूनबाई आहे. 21 एप्रिल 2014 रोजी दिवंगत यश चोप्रा यांचा थोरला मुलगा आणि प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक आदित्यचोप्रासोबत राणीने इटलीत गुपचुप लग्न थाटले. आता राणी एका गोंडस मुलीची आई आहे. गेल्यावर्षी 9 डिसेंबरला राणीने मुलीला जन्म दिला. तिचे नाव आदिरा असे ठेवण्यात आले आहे.
राणीच्या वाढदिवसाच्या निमित्ताने एक नजर टाकुया तिच्या बालपणीच्या छायाचित्रांवर...
बातम्या आणखी आहेत...