आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॉलिवूड अॅक्ट्रेससोबत झाले होते या अब्जाधीशाचे लग्न, लग्नात पाहुणे होते PM आणि राष्ट्राध्यक्ष

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लुधियानाः लग्न, घटस्फोट आणि ड्रग्समध्ये अटक अशा अनेक कारणांमुळे विक्रम चटवाल हा अब्जाधीश चर्चेत राहिला आहे. अमेरिकेतील अब्जाधीश संतसिंह चटवाल यांचा विक्रम मुलगा आहे. अमेरिकेत संतसिंह चटवाल यांचे हॉटेल्स आहेत. आता विक्रम पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. न्यूयॉर्कजवळील सोबो येथे दोन कुत्र्यांना जीवंत जाळल्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपात त्याच्या विरोधात तक्रार दाखल झाली आहे. लग्नात आले होते भारताचे पंतप्रधान आणि
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष...

- हॉटेल व्यवसायिक आणि मॉडेलिंगमध्ये नशीब आजमावलेल्या विक्रमचे लग्न प्रिया सचदेव झाले होते. त्यांची भेट २००३ मध्ये एका पार्टीत झाली होती.
- येथून विक्रमच्या आयुष्य पालटले. पहिल्याच भेटीत विक्रम प्रियाच्या प्रेमात पडला.
- दोघांनी एकमेकांचे नंबर एक्सचेंज केले आणि तासन्तास फोनवर बोलू लागले. दरम्यान विक्रम अमेरिकेत परतला तर प्रिया बॉलिवूड फिल्म्समध्ये बिझी झाली.
- त्याकाळात प्रिया नील अँड निक्की या सिनेमाच्या शूटिंगमध्ये बिझी होती. विक्रमसुद्धा सिनेमांमध्ये झळकला होता.
- अधूनमधून लंडनमध्ये प्रिया आणि विक्रमच्या भेटीगाठी सुरु होत्या.
- २००४ मध्ये भारतात झालेल्या फिल्म फेस्टिव्हलसाठी विक्रम भारतात आला असताना त्याने प्रियाला लग्नाची मागणी घातली. दोन्ही कुटुंबांनी लग्नाला परवानगी दिली.

लग्नात आले होते VVIP's
- प्रिया आणि विक्रमच्या लग्नात भारताचे तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांच्यापासून ते अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन सहभागी झाले होते.
- या लग्नात १२६ देशांतील ६०० पाहुणे आमंत्रित होते. पाहुण्यांसाठी खास चार्टर्ड जेटची सोय करण्यात आली होती.
- २०१० मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित विक्रमचे वडील संतसिंह अमेरिकेतील हेम्पशायर हॉटेल्स अँड रिसोर्ट्सचे मालक आहेत.
- विक्रम आणि प्रियाच्या लग्नात १५० कोटींचा खर्च झाल्याचे म्हटले जाते.

लग्न आणि घटस्फोट..
- विक्रम आणि प्रिया यांना एक मुलगा आहे. लग्नाच्या काही दिवसांतच दोघांमध्ये मतभेद निर्माण झाले आणि त्यांनी २०११ मध्ये घटस्फोट घेतला.
- घटस्फोटाच्या काही दिवसांनी विक्रमला ड्रग्ससह अटक झाली.
- त्याचे नाव हॉलिवूड सेलिब्रिटी लिंडसे लोहानसोबत जुळले होते.


करिश्मा कपूरच्या नव-याची गर्लफ्रेंड आहे प्रिया सचदेव
- विक्रमपासून घटस्फोट घेतल्यानंतर प्रिया भारतात परतरली.
- अभिनेत्री करिश्मा कपूरचा नवरा संजय कपूरसोबत प्रियाचे सूत जुळल्याची चर्चा आहे.
- करिश्मा आणि संजय कपूरच्या घटस्फोटाला प्रिया सचदेव जबाबदार असल्याचे म्हटले जाते. - करिश्मापासून विभक्त झालेला संजय कपूर आता प्रिया सचदेवसोबत लग्न करणार असल्याची चर्चा आहे.

पुढील स्लाईड्समध्ये बघा, प्रिया आणि विक्रम एकत्र असतानाची छायाचित्रे...

(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...