आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ममताला सेटवर मिळाली होती सेक्सची ऑफर, या अभिनेत्रीही झाल्यात कास्टिंग काऊचच्या शिकार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ममता कुलकर्णी आणि शिल्पा शिंदे - Divya Marathi
ममता कुलकर्णी आणि शिल्पा शिंदे
एंटरटेन्मेंट डेस्क: फिल्म इंडस्ट्रीमध्ये बाहेरून कितीही ग्लॅमर आणि चमकधमक दिसत असली तरी त्यामागे एक चेहरा दडलेला असतो. बॉलिवूडच्या या झगमगटाने भरलेल्या जगाचा एक वेगळा चेहराही असतो. त्या चेह-यामागे एक वेगळेच सत्य दडलेले असते. त्यामधील एक सत्य म्हणजे, कास्टिंग काऊच, ज्याचे सामना अनेक सेलेब्सना करावा लागला आहे. अलीकडेच, 'फिराक', 'तारे जमीं पर'सारख्या सिनेमांत दिसलेली अभिनेत्री टिस्का चोप्राने कास्टिंग काऊचची स्टोरी Kommune India नावाच्या यूट्यूब चॅनलसोबत शेअर केली आहे. आम्ही तुम्हाला या पॅकेजच्या माध्यमातून अशाच अभिनेत्रींविषयी सांगत आहोत, ज्यांनी कधी ना कधी कास्टिंग काऊचचा सामना केला आहे.
ममता कुलकर्णी...
ममता कुलकर्णीने राजकुमार संतोषीवर आरोप लावला होता, की 'चाइना गेट' सिनेमाच्या सेटवर त्याने ममताला सेक्सची ऑफर केली होती. ममता कुलकर्णीने सांगितले होते, की ही ऑफर नाकारल्यानंतर संतोषीने तिचा रोल कापून छोटा केला होता. तसेच तिला अनेक सिनेमांतून बाहेर काढले होते. त्यानंतर ममता सिनेमांत दिसली नाही.
शिल्पा शिंदे...
टीव्ही मध्ये येण्यापूर्वी शिल्पा शिंदेने मॉडेलिंग केले होते. स्ट्रगलिंग दिवसांत एका सिनेमासाठी ऑडिशन देताना तिला कास्टिंग काऊचला बळी पडावे लागले होते. अशा कठिण परिस्थिती शिल्पाने हुशारी दाखवत समोरच्या व्यक्तीला थोबाडीत मारली होती. इतकेच नव्हे तर तिला खूप अपमान सहन करावे लागला होता.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या Casting Couchच्या शिकार झालेल्या अभिनेत्रींविषयी...
बातम्या आणखी आहेत...