आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्या भारतीसह हे Celebs, कुणी 19 तर कुणी 35व्या वर्षी घेतला जगाचा निरोप

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एकेकाळी बॉलिवूडच्या सुंदर अभिनेत्रींमध्ये सामील होणारी दिव्या भारतीची आज 22वी पुण्यतिथी आहे. 5 एप्रिल 1993 रोजी मुंबईच्या वार्सोवा स्थित तुलसी अपार्टमेंटच्या 5व्या मजल्यावरून पडून तिचा मृत्यू झाला होता. आजसुध्दा तिच्या मृत्यूचे रहस्य एका बंद पेटीत दडल्यासारखे आहे. कमी वयातच नाव कमवणा-या अभिनेत्रींमध्ये दिव्याचे नाव घेतले जात होते.
तेलगु सिनेमांतून केली करिअरला सुरुवात-
दिव्याने आपल्या अभिनयाची सुरुवात तेलगु सिनेमांतून केली होती. 1990मध्ये आलेल्या 'Bobbilo Raja' सिनेमातून पहिल्यांदा तिचा अभिनय लोकांनी मिळाली. 1992मध्ये राजीव राय यांच्या 'विश्वात्मा'मधून तिचे बॉलिवूडमध्ये एंट्री केली. यामध्ये सनी देओलने तिच्यासोबत काम केले होते. मात्र हा सिनेमा फ्लॉप ठरला आणि तिला डेव्हिड धवन यांच्या 'शोला और शबनम'मधून खरी लोकप्रियता मिळाली.
20पेक्षा जास्त सिनेमांत केले काम-
दिव्या भारतीने तेलगु सिनेमातून जरी करिअरला सुरुवात केली असली तरी तिला बॉलिवूडमध्ये हवे तेवढे यश मिळाले होते. दोन्ही भाषांमध्ये तिने 20 सिनेमे केले. यामध्ये, 'दीवाना', 'गीत' 'दिल ही तो है', 'दिल आशना है' आणि 'रंग' हे सिनेमे सामील आहेत. हे सर्व सिनेमे तिने 1991 ते 1993 या काळात केले.
लग्नाच्या काही महिन्यातच दिव्याचा मृत्यू-
बातम्यांनुसार, 10 मे 1992मध्ये तिने दिग्दर्शक साजिद नाडियाडवालासोबत लग्न केले. लग्नाला वर्षसुध्दा झाले नव्हते, की दिव्याच्या मृत्यूची बातमी ऐकायला आली. दिव्याचे निधन वयाच्या 19व्या वर्षी झाले. कमी वयातच जगाचा निरोप घेणा-यांमध्ये केवळ दिव्याच नव्हे बॉलिवूडच्या इतरही अभिनेत्री सामील आहेत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या कमी वयातच जगाचा निरोप घेणा-या अभिनेत्रींविषयी...