आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फिरोजचा कॅन्सर तर यश चोप्रा यांचा डेंगूमुळे, आजारांनी घेतला या CELEBSचा जीव

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फिरोज खान आणि यश चोप्रा) - Divya Marathi
(फिरोज खान आणि यश चोप्रा)
स्टायलिश आणि बिनधास्त अभिनेते फिरोज खान यांची आज पुण्यतिथी आहे. ते कॅन्सरने ग्रस्त होते आणि 27 एप्रिल 2009ला त्यांनी बंगळुरु स्थित फार्महाऊसमध्ये अखेरचा श्वास घेतला. त्यांचा शेवटचा सिनेमा 'वेलकम' होता. त्यात त्यांनी खलनायकाची भूमिका साकारली होती. फिरोजशिवाय अनेक सेलेब्स आहेत, ज्यांना कोणत्या ना कोणत्या आजारामुळे जीव गमवावा लागला.
जाणून घेऊया फिरोज यांच्याविषयी...
फिरोज खान असे अभिनेते ज्यांनी स्वत: एका प्रतिमेत बांधून ठेवले नाही. त्यांनी 'दीदी' (1960) सिनेमातून करिअरला सुरुवात केली. 'दीदी'नंतर 1962मध्ये 'टार्जन गोज टू इंडिया' सिनेमात काम केले. 1965मध्ये त्यांना 'उंचे लोग' सिनेमा हिट झाला. फिरोज यांच्यासाठी 70चे दशक उत्कृष्ट ठरले. 1970मध्ये त्यांनी 'आदमी और इंसान' सिनेमात काम केले. या सिनेमासाठी त्यांना फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेता पुरस्कार मिळाला होता. 1970मध्ये त्यांनी निर्माता-दिग्दर्शक म्हणून काम केले. फिरोज यांनी 'धर्मात्मा' सिनेमा निर्मित केला. त्यांनी 70 आणि 80च्या दशकात 'धर्मात्मा', 'कुर्बानी', 'जांबाज', 'दयावान'सारखे सुपरहिट सिनेमे दिले.
यश चोप्रा...
'किंग ऑफ रोमान्स' नावाने ओळखले जाणारे प्रसिध्द दिग्दर्शक यश चोप्रा यांचा मृत्यू डेंगूमुळे झाला होता. त्यांनी 21 ऑक्टोबर 2012ला जगाचा निरोप घेतला.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या आजारामुळे झाले या कलाकारांचे निधन...