आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Celebrities Who Are Still Friends After Break Up

देव-फ्रिडा, सलमान-कतरिनासह या सेलेब्सचे प्रेमभंग होऊनदेखील मैत्री कायम

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'स्लमडॉग मिलेनिअर' सिनेमातून देव पटेल आणि फ्रिडा पिंटोचा रोमान्स सुरु झाला होता. सहा वर्षे दोघे रिलेशनशिपमध्ये राहिले आणि मागील वर्षी दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. डिसेंबरमध्ये दोघांचे नाते तुटले, ही बातमी सर्वांना आश्चर्यचकित करणारी होती. तेव्हापासून दोघे आतापर्यंत कधीच सोबत दिसले नाही. अलीकडेच फ्रिडा पिंटोने दिर्घकाळानंतर देव पटेलसोबतच्या ब्रेकअपविषयी बातचीत केली.
तिने सांगितले, ब्रेकअपनंतरसुध्दा दोघे चांगले मित्र आहेत. फ्रिडाचे म्हणणे आहे, 'मी आणि देव बेस्ट फ्रेंड आहोत आणि नेहमी राहू. आमच्या जे काही झाले त्याचा परिणाम आमच्या मैत्रीवर कधीच पडणार नाही.' यूएसए टुडेला दिलेल्या मुलाखतीत फ्रिडाने सांगितले, 'प्रत्येक व्यक्तीचे आपले आयुष्य असते आणि ती स्वत:ला शोधत असते. त्यादरम्यान काही आश्चर्यकारक गोष्टी भेटतात, ज्या आनंद देतात. तसेच दु:ख आणि निराशा असलेले क्षणही येतात. परंतु हे आयुष्यात घडतच असते. आम्ही सोबत होतो, चांगले होतो. आता नाहीये तर पळून जाऊ शकत नाही. आम्ही यावेळेचा हिम्मतीने सामना करत आहोत आणि आमची मैत्री टिकवत आहोत.'
बॉलिवूडचा 'दबंग' खान सलमान खान आणि कतरिना कैफ पाच वर्षे रिलेशनमध्ये होते. त्यानंतर दोघे विभक्त झाले. रिलेशनशिपमध्ये नसूनदेखील दोघांची मैत्री कायम आहे. काही दिवसांपूर्वी कतरिनाने सांगितले होते, 'सलमानचा सल्ला आजसुध्दा तिच्यासाठी महत्वाचा आहे. त्याने दिलेल्या सल्ल्यानुसारच ती काम करते. त्याचा सल्ला नेहमी तिच्यासाठी फायदेशीर ठरतो. दोघांचे ब्रेकअप झाल्यानंतर त्यांनी 'एक था टायगर' सिनेमात काम केले होते.'
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या अशाच सेलेब्सविषीय ज्यांचे ब्रेकअप होऊनदेखील त्यांची मैत्री कायम आहे...