आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रीती झिंटाच्या 34 मुली तर अँजेलिनाची 6 मुले, या CELEBS नी दत्तक घेतली आहेत मुले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(प्रीती झिंटा आणि अँजेलिना जोली)
बॉलिवूड सेलेब्स असो, वा हॉलिवूड, यांना नेहमी फॅशन आणि स्टाइलचे ट्रेंड सेटर समजले जाते. मात्र यापैकी काही सेलिब्रिटी असे आहेत, जे समाजासाठी वेगळा ट्रेंड सेट करत आहेत. वेगवेगळ्या विषयांवर लोकांना जागरुक करणा-या या सेलिब्रिटींनी मुले दत्तक घेण्याचा ट्रेंड सुरु केला आहे. बी टाऊनमध्ये अनेक सेलेब्स आहेत, ज्यांनी मुले दत्तक घेतली आहेत.
प्रीती झिंटा
अभिनेत्री प्रीती झिंटा अद्याप अविवाहित आहे. मात्र तिने स्वयंनिर्णयातून मुली दत्तक घेऊन एकल मातृत्व स्वीकारले आहे. प्रीतीने एक-दो नव्हे तर तब्बल 34 मुलींना दत्तक घेतले आहे. 2009मध्ये ऋषीकेश येथे तिने 34 अनाथ मुलींना दत्तक घेतले. वर्षातून दोनदा प्रीती आपल्या या मुलींना भेटायला नक्की जात असते.
अँजेलिना जोली
मुले दत्तक घेण्यात अभिनेत्री अँजेलिना जोलीदेखील मागे नाहीये. अँजेलिना आणि तिचा पती ब्रॅड पिट यांना एकुण सहा मुले आहेत. यापैकी तीन त्यांनी दत्तक घेतली तर तिघांना जन्म दिला आहे. 2002मध्ये मुलगा मडोक्स, 2006 मध्ये मुलगा जहरा आणि 2007 मध्ये दुसरा मुलगा पॅक्सला त्यांनी दत्तक घेतले. तर शोलो, नॉक्स आणि विवएन या तीन मुलांना त्यांनी जन्म दिला.
पुढील स्लाईड्समध्ये जाणून घ्या आणखी अशा सेलिब्रिटींविषयी ज्यांनी मुले दत्तक घेतली आहेत.