आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सँड्रा बुलकपासून ते मिथून चक्रवर्तीं, नीलमपर्यंत, या 13 CELEBS नी दत्तक घेतली आहेत मुले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटोः सँड्रा बुलक, मुलगी दिशानीसोबत मिथून चक्रवर्तीं, मुलगी अहानासोबत अभिनेत्री नीलम - Divya Marathi
फोटोः सँड्रा बुलक, मुलगी दिशानीसोबत मिथून चक्रवर्तीं, मुलगी अहानासोबत अभिनेत्री नीलम

हॉलिवूड सेलेब्स असो वा बॉलिवूड, यांना नेहमीच फॅशन आणि स्टाइलचे ट्रेंड सेंटर समजले जाते. मात्र काही सेलेब्स असेही आहेत, जे वेगळा ट्रेंड आणण्याचा प्रयत्न करतात. वेगवेगळ्या मुद्द्यावर लोकांना जागरुक करणा-या काही सेलेब्सनी अॅप्शनचा नवा ट्रेंड सुरु केला आहे. बॉलिवूड आणि हॉलिवूडच्या काही सेलिब्रिटींनी मुलांना दत्तक घेऊन त्यांना आपले नाव दिले आहे. अलीकडेच हॉलिवूड अभिनेत्री सँड्रा बुलक हिने एका तीन वर्षांच्या मुलीला दत्त घेतले असून तिचे नाव लैला ठेवले आहे. पाच वर्षांपूर्वी सँड्राने एक मुलाला दत्तक घेतले होते. ती म्हणाली, ''लैला लुझसियाना येथील एका फोस्टर केअरमध्ये राहात होती. तिला दत्तक घेताना मला अनेक प्रक्रियांमधून जावे लागले.''
मिथून चक्रवर्ती
बॉलिवूड अभिनेता आणि डिस्को डान्सर या नावाने प्रसिद्ध असलेले अभिनेते मिथून चक्रवर्ती यांना तीन मुले असून महाक्षय, रिमोह आणि नमाशी चक्रवर्ती ही त्यांची नावे आहेत. मिथून दांनी एका मुलीला दत्तक घेतले असून तिचे नाव त्यांनी दिशानी चक्रवर्ती असे ठेवले आहे.
पुढील स्लाईड्समध्ये जाणून घ्या आणखी अशा सेलिब्रिटींविषयी ज्यांनी मुले दत्तक घेतली आहेत.
बातम्या आणखी आहेत...