आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Rape Caseमध्ये अडकले होते हे फेमस सेलेब्स, अनेकांनी भोगलाय तुरुंगवास

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(महमूद फारुकी आणि शाइनी आहूजा) - Divya Marathi
(महमूद फारुकी आणि शाइनी आहूजा)
दिल्लीच्या साकेत कोर्टाने 'पीपली लाइव्ह' सिनेमाचा सह-दिग्दर्शक महमूद फारुकीला बलात्कार प्रकरणात दोषी ठरवले आहे. कोर्टाने आज (2 ऑगस्ट) या प्रकरणाची शिक्षा सुनावली. फारुकीवर एका 35 वर्षीय अमेरिकन संशोधक स्कॉलरने बलात्कार केल्याचा आरोप लावला होता. फारुकी एकटा असा व्यक्ती नाहीये, ज्याच्यावर बलात्काराचा आरोप लागला आहे. अनेक सेलेब्स अशा प्रकरणात अडकले आहेत. जाणून घेऊया अशा सेलेब्सविषयी...
आज सुनावणार शिक्षा...
'पीपली लाइव्ह'चा सह-दिग्दर्शक महमूद फारुकीला बलात्कार प्रकरणात शिक्षा सुनावली जाणार आहे. पीडित अमेरिकेच्या कोलंबिया यूनिव्हर्सिटीमध्ये पीएचडी करत होती. ती संशोधनासाठी भारतात आली होती. पीडिताने फारुकीच्या विरोधात 28 मार्च 2015ला दिल्लीच्या फ्रेंड्स कॉलनी ठाण्यात तक्रार दाखल केली होती. अमेरिकन संशोधकांचा आरोप होता, की महमूद फारुकीने 28 मार्च 2015ला दिल्लीच्या सुखदेव विहार स्थित घरी तिच्यावर बलात्कार केला. घटनेवेळी फारुकी नशेत होता. महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तपास घेऊन 20 जून 2015ला फारुकीला न्यायालयीन कोठडीत पाठवले.
मोलकरीणीने लावला होता बलात्काराचा आरोप
बॉलिवूड कलाकार शायनी आहूजा याच्यावर 2009 मध्ये त्याच्या मोलकरणीने बलात्काराचा आरोप केला होता. मोलकरणीच्या सांगण्यानुसार जेव्हा शायनीची पत्नी शहरात नव्हती, तेव्हा तिच्यावर बलात्कार करण्यात आला होता. शायनी सतत या गोष्टींचा विरोध करत राहिला परंतू DNA चाचणीत बलात्कार केल्याचे सिद्ध झाले. यानंतर त्याला तुरूंगची हवादेखील खावी लागली होती. या आरोपानंतर शायनीचे बॉलिवूडमधले करिअर संपुष्टात आले. ‘गँगस्टर’, ‘भूल भूलैया’ आणि ‘लाइफ इन ए मेट्रो’ यासारख्या सिनेमांत त्याने काम केले आहे. बलात्काराच्या प्रकरणात त्याला 27 एप्रिल 2011 रोजी न्यायालयाने त्याला जामीन दिला आणि 4 मेला तुरूंगातून सोडून दिले होते. सध्या प्रकरण न्यायालयात सुरू आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या, कोण-कोणत्या सेलेब्सवर बलात्काराच आरोप लागला आहे...
बातम्या आणखी आहेत...