आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B\'day: सायरा बानो-दिलीप साहेबच नव्हे, या कपल्सच्या वयातसुद्धा आहे कमालीचे अंतर!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्कः गतकाळातील प्रसिद्ध अभिनेत्री सायरा बानो यांनी मंगळवारी (जन्म 23 ऑगस्ट 1944) आपल्या वयाची 72 वर्षे पूर्ण केली आहेत. याकाळात मोठ्या पडद्यापासून लांब असलेल्या सायरा यांनी वयाच्या सोळाव्या वर्षी फिल्मी दुनियेत पाऊल ठेवले होते. सायरा यांनी 1966मध्ये वयाच्या 22 व्या वर्षी दिलीप कुमार यांच्यासह लग्न केले. त्यावेळी दिलीप साहेब आणि सायरा बानो यांच्या लग्नाची बातमी सर्वांना अचंबित करणारी होती. याचे कारण होते सायरा आणि दिलीप साहेब यांच्या वयात असलेले अंतर. सायरा दिलीप साहेबांपेक्षा पाच किंवा दहा नव्हे तर तब्बल 22 वर्षांनी लहान आहेत.
सायरा बानो यांच्या जन्माच्या वेळी दिलीप साहेबांनी 'ज्वारा भाटा' (1944) या सिनेमाद्वारे फिल्मी दुनियेत पाऊल ठेवले होते. सायरा यांच्यासह लग्नाच्या वेळी दिलीप साहेब 44 वर्षांचे होते. 11 ऑक्टोबर 1966 रोजी ही जोडी लग्नाच्या बेडीत अडकली. हे जोडपं गेल्या 49 वर्षांपासून एकमेकांची साथ निभावत आहे.
तसे पाहता कमी वयाच्या मुलीसह लग्न करणारे दिलीप साहेब पहिले सेलिब्रिटी नाहीयेत. असे अनेक स्टार्स आहेत, ज्यांनी त्यांच्यापेक्षा वयाने खूप लहान मुलीसह लग्न थाटले.
सायरा बानू आणि दिलीप कुमार
लग्नाचे वर्ष : 1966

दिलीप साहेबांची जन्मतारीख : 12 डिसेंबर 1922
सायरा बानो यांची जन्मतारीख : 23 ऑगस्ट 1944
वयातील अंतर : 22 वर्षे
कबीर बेदी आणि परवीन दोसांज
लग्नाचे वर्ष : 2016

कबीर बेदींची जन्मतारीख : 16 जानेवारी 1946
परवीनची जन्मतारीख : 18 सप्टेंबर 1975
वयातील अंतर : 29 वर्षे
पुढील स्लाईड्समध्ये जाणून घ्या अशा स्टार कपल्सविषयी ज्यांच्यात आहे मोठी Age Gap..

(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...