आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अमिताभ-रेखा, मिथून-श्रीदेवीपासून ते माधुरी-संजयपर्यंत, या 10 स्टार्सची अधुरी राहिली प्रेमकहाणी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिल्व्हर स्क्रिनवर आपल्या अभिनय आणि सौंदर्याची जादू दाखवणारी एव्हरग्रीन अभिनेत्री रेखा यांनी नुकतीच वयाची 62 वर्षे पूर्ण केली आहेत. तर आज बिग बींचा वाढदिवस आहे. रेखा आणि अमिताभ यांची प्रेमकहाणी ठाऊक नसलेला शोधून सापडणार नाही. सिल्व्हर स्क्रिनवर अनेक अभिनेत्यांसोबत रेखाची जोडी जमली. मात्र खासगी आयुष्यात ख-या प्रेमाला ती नेहमी मुकली.
अमिताभ बच्चन यांच्यासोबतचे तिचे अफेअर कुणापासूनही लपून राहिलेले नाही. मात्र रेखाला तिचे खरे प्रेम कधीच मिळाले नाही. बॉलिवूडमध्ये रेखाप्रमाणेच असे अनेक स्टार्स आहेत, ज्यांना त्यांचे प्रेम मिळाले नाही.
रेखा-अमिताभची अधुरी राहिली प्रेमकहाणी...
बॉलिवूडमधील कलाकारांच्या लव्ह लाईफचा विषय निघाला असताना रेखा आणि अमिताभविषयी न बोलून कसे चालेल. या दोघांची लव्ह स्टोरी 'दो अंजाने' या सिनेमाच्या सेटवर सुरु झाली. काही दिवसांतच या दोघांचे प्रेमप्रकरण लाईमलाईटमध्ये आले. या दोघांनी गुपचुप लग्न केले, अशाही बातम्या त्यावेळी खूप रंगल्या होत्या. अमिताभ यांनी रेखावरील आपले प्रेम कधीही जगजाहीर केले नाही. तर दुसरीकडे मात्र रेखाने अनेकदा सार्वजनिकरित्या आपल्या प्रेमाची कबूली दिली आहे. 1984 साली फिल्मफेअर मॅगझिनला दिलेल्या एका मुलाखतीत रेखा अमिताभ आणि तिच्या नात्याबद्दल सविस्तर बोलली होती. अमिताभ यांच्याविषयी रेखा म्हणाली होती की, ''अमिताभ आपले प्रेम जगजाहीर करत नाही, त्याबद्दल माझी कोणतीही तक्रार नाही. अखेर त्यांनी असे का करु नये. त्यांनाही आपले इमेज, कुटुंब आणि मुलांना सांभाळायचे आहे. लोकांना माझ्या आणि त्यांच्या नात्याबद्दल का जाणून घ्यायचे आहे, हे मला कळत नाही. माझे त्यांच्यावर प्रेम आहे आणि त्यांचे माझ्यावर. इथेच ही गोष्ट संपून जाते.''
'सिलसिला' या दोघांचा एकत्र असलेला शेवटचा सिनेमा होता. या सिनेमाचे शुटिंग संपत संपता त्यांच्या प्रेमाचा रंगही उतरु लागला होता. रेखा यांनी अमिताभ यांच्याबरोबर संसार थाटायचा होता. मात्र त्यांच्या नात्याचे रुपांतर लग्नात होऊ शकले नाही. अखेर ऑन स्क्रिन आणि ऑफ स्क्रिनही या दोघांच्या नात्याचा अंत झाला.
पुढील स्लाईड्समध्ये वाचा, आणखी अशा काही अफेअर्सविषयी, ज्याचे रुपांतर लग्नात होऊ शकले नाही...

(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...