आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

So Cute: संजयच्या मिशीला पिळ देताना दिसली मान्यता, ऐश्वर्यावर खिळली अभिषेकची नजर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बिपाशा-करणच्या वेडिंग रिसेप्शनमध्ये पोहोचलेले सेलिब्रिटी कपल्स... - Divya Marathi
बिपाशा-करणच्या वेडिंग रिसेप्शनमध्ये पोहोचलेले सेलिब्रिटी कपल्स...
एन्टरटेन्मेंट डेस्कः बॉलिवूडमध्ये सध्या चर्चा आहे ती बिपाशा बसू आणि करण सिंग ग्रोवरच्या लग्नाची. 30 एप्रिल रोजी बंगाली पद्धतीने हे दोघे लग्नगाठीत अडकले. लग्नानंतर मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये दोघांचे वेडिंग रिसेप्शन झाले. या पार्टीत बॉलिवूडकरांची मांदियाळी पाहायला मिळाली. सलमान खान, शाहरुख खान, अमिताभ बच्चन, तब्बू, दिया मिर्झा, सुश्मिता सेन यांच्यासह बॉलिवूडमधील दिग्गज बिपाशा-करणला भावी आयुष्यासाठी शुभेच्छा द्यायला पोहोचले होते.
या सेलिब्रिटींसोबतच बॉलिवूडमधील सेलिब्रिटी कपल्सही रिसेप्शनमध्ये हातात हात घालून पोहोचले. ऐश्वर्या-अभिषेक, जेनेलिया-रितेश, मधुर भंडाकर आणि त्यांची पत्नी, भूषण कुमार-दिव्या खोसला, रवी दुबे-सरगुन, आर. माधवन आणि त्याच्या पत्नीसह अनेक सेलिब्रिटी आपल्या जोडीदारासोबत येथे पोहोचले होते.
या सर्व सेलिब्रिटी कपल्समध्ये लक्ष वेधून घेतले ते संजय दत्त आणि मान्यता दत्त यांनी. ब्लॅक कलरच्या सूटमध्ये संजय आणि ब्लॅक कॉम्बिनेशनच्या साडीत हे कपल अतिशय सुंदर दिसले. विशेष म्हणजे कॅमे-यासमोर पोज देण्यापूर्वी मान्यता संजयच्या मिशीला पिळ देताना दिसली. संजयची मिशी नीट केल्यानंतर दोघांनी मीडियाला भरपूर पोज दिल्या. या दोघांचा हा रोमँटिक अंदाज सर्वांचे लक्ष वेधणारा ठरला.
तर पत्नी ऐश्वर्याकडे अभिषेकच्या नजरा खिळल्या होत्या. ऐश्वर्याकडे रोमँटिक अंदाजात बघतानाचा अभिषेकचा फोटो मीडियाने क्लिक केला. या पार्टीत प्रेग्नेंट जेनेलिया पती रितेशसोबत पोहोचली होती. लवकरच दुस-यांदा आई होणारी जेनेलियासुद्धा अतिशय सुंदर दिसली.
या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला बिपाशा-करणच्या वेडिंग रिसेप्शनमध्ये क्लिक झालेला सेलिब्रिटी कपल्सचा खास अंदाज दाखवत आहोत. पुढील स्लाईड्समध्ये पाहा, लक्ष वेधून घेणारी सेलिब्रिटी कपल्सची ही खास झलक...
बातम्या आणखी आहेत...