आज
आपल्या समाजात लिव्ह इन रिलेशनशिप सामान्य बाब झाली आहे. बॉलिवूडविषयी बोलायचे झाल्यास आजच्या काळात येथे लिव्ह-इनमध्ये राहणे कल्चर बनले आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. काही वर्षे लिव्ह इनमध्ये राहिल्यानंतर ब-याच सेलेब्सनी आपले नाते संपुष्टात आणले. तर काहींनी काही वर्षे लिव्ह इनमध्ये राहिल्यानंतर लग्न केले.
अभिनेता आदित्य पांचोली आणि बॉलिवूडची क्वीन कंगना रनोटचेच उदाहरण घ्या ना. जरीना वहाबसोबत लग्न केल्यानंतर काही वर्षांनी आदित्य पांचोलीच्या आयुष्यात त्याच्यापेक्षा वयाने 22 वर्षे लहान असलेल्या कंगना रनोटची एन्ट्री झाली होती. त्यांच्या अफेअरच्या बातम्या ब-याच चर्चेत आल्या होत्या. कंगना त्यावेळी सिनेसृष्टीत संघर्ष करत होती. तर आदित्य तिचा मेंटर होता. त्यावेळी कंगना केवळ 18 वर्षांची होती. दोघे बरेच दिवस लिव्ह इन रिलेशनशिपमध्येही राहिले. याचा परिणाम आदित्यच्या वैवाहिक आयुष्यावर पडला. कंगनासोबत ब्रेक्रप झाल्यानंतर आदित्यने तो तिच्यासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होता, याची कबुली दिली होती. त्यामुळे आपल्या कौटुंबिक आयुष्यावर त्याचा परिणाम झाल्याचेही त्याने मान्य केले होते.
आदित्य आणि कंगनाप्रमाणेच आणखी कोणकोणते सेलेब्स लिव्ह इनमध्ये आणि सध्या आहेत, जाणून घ्या, पुढील स्लाईड्समध्ये...