आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

करण बनला सिंगल पेरेंट, लग्नाच्या ब-याच वर्षांनंतरसुद्धा या सेलिब्रिटींना नाहीये स्वतःचे मुलबाळ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई: सरोगेसीच्या माध्यमातून 44 वर्षीय दिग्दर्शक-निर्माता करण जोहर बाबा झाला आहे. करण जोहरला जुळी मुलं झाली असून त्यापैकी एक मुलगा आणि एक मुलगी आहे. करणने त्याच्या मुलाचे नाव यश तर मुलीचे नाव रुही असे ठेवले आहे. वडील झाल्याचा आनंद व्यक्त करताना करण म्हणाला, "मी या मुलांचा वडील झाल्याने खूप आनंदात आहे. वैद्यकीय चमत्कारानं माझ्या आयुष्यात माझ्या काळजाचे दोन तुकडे अवतरले आहेत. आता ही मुलं– रुही आणि यश हेच माझं विश्व आहे आणि त्यासाठी इतर कामं मी कमी करणार आहे,"  

सरोगसीच्या मदतीने सिंगल पेरेंट होणारा करण जोहर हा अलीकडच्या काळातील दुसरा सेलिब्रिटी ठरला आहे. या अगोदर तुषार कपूर देखील सरोगसीच्या माध्यमातून एका मुलाचा पिता झाला आहे. पण बॉलिवूडमध्ये असे अनेक सेलिब्रिटी कपल आहेत, जे लग्नाच्या ब-याच वर्षांनंतरसुद्धा आईवडील होऊ शकले नाहीत. 

अनुपम खेर यांनी सावत्र मुलाला दिले स्वतःचे नाव 
अभिनेता अनुपम खेर आणि अभिनेत्री किरण खेर यांची पहिली भेट चंदीगढमध्ये झाली होती. 1985 साली दोघांनी लग्न केले होते. अनुपम खेर यांच्याशी लग्नगाठीत अडकण्यापूर्वी किरण खेर विवाहित होत्या. शिवाय त्यांना एक मुलगासुद्धा होता. मात्र पहिल्या पतीबरोबर घटस्फोट घेतल्यानंतर त्यांनी अनुपम खेर यांच्याशी लग्न केले. अनुपम खेर यांनी किरण यांच्या मुलाला स्वीकारले असून त्यांचे स्वतःचे अपत्य नाहीये.  

पुढील स्लाईड्समध्ये जाणून घेऊयात, अशाच काही सेलिब्रिटी जोड्यांविषयी...
 
बातम्या आणखी आहेत...