आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अक्षय-रवीना अन् अभिषेक करिश्मा, जेव्हा ऐनवेळी मोडले या सेलिब्रिटींचे लग्न

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी लग्नाअगोदर एकमेकांना डेट केले. यातील काही नाती तर साखरपुड्यापर्यंतही पोहोचल्या. पण ऐनवेळी यांचे लग्न तुटले. यात रवीना-अक्षयपासून सलमान, अक्षयकुमार यांचाही समावेश आहे ज्यांचे लग्न ऐनवेळी मोडले.
 
रवीना टंडन आणि अक्षय कुमार 
- मोहरा चित्रपटात सोबत काम केल्यापासून अक्षय-रवीनाचे अफेअर सुरु झाले. यादोघांमध्ये तीन वर्षांपर्यंत प्रेमसंबंध होते.
- एका मुलाखतीत रवीनाने सांगितले की, तिने अक्षयसोबत एका मंदिरात गुपचूप साखपरपूडाही केला. अक्षयला त्याची लोकप्रियता कमी होईल याची जास्त चिंता होती, म्हणून त्याने ही गोष्ट सर्वांपासून लपविली असे रवीना म्हटली.
- दोघांचे नाते लग्नापर्यंत येऊन पोहोचले होते त्याचवेळी अक्षयच्या आयुष्यात शिल्पा आली. अक्षय रवीना आणि शिल्पाला सोबतच डेट करत होता असेही म्हटले जाते.
- यानंतर अक्षय कुमारने अभिनेत्री ट्विंकल खन्ना आणि रवीनाने बिजनेसमॅन अनिल थडानीसोबत विवाह केला.
 
अभिषेक बच्चन आणि करिश्मा कपूर
- करिष्मा-अभिषेकमध्ये अभिषेकची बहिण श्वेताच्या लग्नात प्रेमांकुर फुलला. श्वेता बच्चनचे लग्न करिश्माच्या आत्याच्या मुलासोबत झाले आहे. या लग्नावेळी दोघे एकमेकांच्या जवळ आले.
- याचवेळी अभिषेकला त्याचा डेब्यू चित्रपट रेफ्युजी मिळाला. त्यात करिना त्याची अभिनेत्री होती. असे म्हणतात की करिना अभिषेकला सेटवर जीजू म्हणत असे. 
- यानंतर अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या वाढदिवशी अभिषेक-करिश्माचा साखरपुड्याची घोषणा केली.
- असे म्हणतात की, त्यावेळी करिश्माची आई बबिताला हे लग्न मंजूर नव्हते. त्यावेळी करिश्मा टॉपची अभिनेत्री होती तर अभिषेकचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपटत होते.
- बबिताला ही भीती होती की जर अभिषेक सफल नाही झाला तर कसे होणार. करिश्माही आईच्या निर्णयाला विरोध करु शकली नाही आणि अखेर त्यांचा साखरपुडा तुटला.
- त्यानंतर अभिषेकने ऐश्वर्या रॉयबरोबर विवाह केला आणि करिश्मा कपूरने लहानपणीचा मित्र संजय कपूरबरोबर लग्न थाटले. करिश्मा-संजयचा आता घटस्फोट झाला आहे आणि करिश्मा दुसऱ्या लग्नाच्या तयारीत आहे. संजय कपूरनेही प्रिया चटवालबरोबर विवाह थाटला आहे.
 
पुढच्या स्लाईडवर वाचा, अशाच काही ऐनवेळी मोडलेल्या नात्यांबाबत.. 
 
बातम्या आणखी आहेत...