आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बालपणीचे स्वप्न राहिले अपूर्ण, भलत्याच करिअरमध्ये या सेलेब्सना मिळाले यश

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अनेक लोक बालपणीच ठरवत असतात की, त्यांना मोठे झाल्यावर काय करायचे आहे किंवा कोणत्या क्षेत्रात करिअर करायचे आहे. पण जर नशिबात भलतेच काहीतरी लिहिलेले असेल तर काय करणार. अनेक सेलिब्रिटींबाबत असेच काहीतरी घडले आहे. त्यात परिणिती चोप्रा, स्मृती इराणी, महेंद्रसिंह धोनी यांच्यासह असे अनेक सेलिब्रिटी आहेत. प्रत्येक क्षेत्रात अशी अनेक नावे आहेत, ज्यांना बालपणी वेगळेच काहीतरी व्हायचे होते, पण त्यांना दुसऱ्याच क्षेत्रात यश मिळाले आणि त्यांच्या जीवनाची दिशाच बदलली. 

परिणिती चोप्रा 
परिणीति चोप्रा 28 वर्षांची (22 ऑक्टोबर) झाली आहे. आज ती आघाडीच्या अॅक्ट्रेसेसपैकी एक आहे. पण तिने कधीही या क्षेत्रात येण्याचा विचारही केला नव्हता. चित्रपट क्षेत्राशी कीहीह संबंध नसल्याने ती बँकिंग क्षेत्रात जाण्याच्या विचारात होती. 2009 मध्ये शिक्षण पूर्ण करून ती भारतात परतली. यशराज फिल्म्समध्ये तिने पब्लिक रिलेशन्स कन्सल्टंट म्हणून जॉइन केले. काही दिवसांनी तिच्याकडे चित्रपटाच्या ऑफर्स आल्या आणि तिने याच बॅनरबरोबर 3 चित्रपटांचे कॉन्ट्रॅक्ट साईन केले. 2011 मध्ये परिणितीचा पहिला चित्रपट 'लेडीज वर्सेस रिकी बहल' रिलीज झाला होता. 
 
महेंद्र सिंह धोनी
महेंद्र सिंह धोनी भारतीय टीमचा सर्वात यशस्वी कर्णधार राहिलेला आहे. किक्रेटमध्ये मोठी ओळख निर्माण करणारा धोनी हा शालेय दिवसांत फुटबॉल खेळायचा आणि त्यातही तो गोलकिपर होता. क्रिकेटमध्ये येण्यापूर्वी तो खरगपूरच्या एका क्लबतर्फे खेळलाही होता. पण त्याच्या नशिबात कदाचित क्रिकेटर बनणेच लिहिलेले होते. 

पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या अशाच काही सेलिब्रिटींबाबत.. 
बातम्या आणखी आहेत...