मुंबई - कॅन्सर पेशंट्स अँड असोसिएशनच्या एका कार्यक्रमात भाग घेण्यासाठी पोहोचलेल्या दिग्दर्शक रोहित शेट्टीने येथील दहा कॅन्सरपीडित मुलांना दत्तक घेतले आहे. यावेळी त्याने करण जोहरसोबत राम लखन या सिनेमाचा रिमेक करणार नसल्याचे स्पष्ट केले. करण जोहरसोबत काम करणार, मात्र तो सिनेमा राम लखनचा रिमेक नसून दुसरा सिनेमा असेल, असे रोहितने यावेळी सांगितले.
यापूर्वी अनेक सेलिब्रिटींनी दत्तक घेतली आहेत मुले...
मुलांना दत्तक घेणारा रोहित एकमेव सेलिब्रिटी नाहीये. यापूर्वीही सुश्मिता सेन, प्रीती झिंटा, सलीम खान, रवीना टंडन या सेलिब्रिटींनी मुलांना दत्तक घेतले आहे. सुश्मिता सेन 2 मुलींची तर प्रिती झिंटा 34 मुलींची आई असल्याचे तुम्हाला ठाऊक आहे का? प्रीती अलीकडेच लग्नाच्या बेडीत अडकली तर सुश्मिता अद्यापही अविवाहित आहे. या अभिनेत्रींनी मुलींना दत्तक घेतले असून त्यांचे पालनपोषण करत आहेत.
प्रीती झिंटा
डिंपल गर्ल प्रीती झिटांने एक दोन नव्हे तर तब्बल 34 मुलींना दत्तक घेतले आहे. ऋषिकेशमध्ये 2009 मध्ये तिने या सर्व मुलींना दत्तक घेतले होते. या सर्व मुलींच्या शिक्षण आणि पालनपोषणाकडे प्रिती जातीने लक्ष देते. वर्षातून दोनदा ती सर्व मुलींना आवर्जुन भेटायला जात असते.
पुढील स्लाईड्समध्ये जाणून घ्या, अशा सेलिब्रिटींविषयी ज्यांनी मुलांना दत्तक घेतले आहे...