आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ड्रग्सच्या विळख्यात अडकलेले स्टार्स : कुणी गेले तुरुंगात, तर कुणी केली अनेकांसोबत शय्यासोबत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - अभिनेता संजय दत्तच्या आयुष्यावर दिग्दर्शक राजकुमार हिराणी सिनेमा बनवत असून यामध्ये अभिनेता रणबीर कपूर संजय दत्तची भूमिका साकारणार आहे. तर अभिनेत्री मनिषा कोईरालाची निवड नर्गिस यांच्या व्यक्तिरेखेसाठी करण्यात आली आहे. संजय दत्तची भूमिका साकारण्यासाठी रणबीर कपूरने तब्बल 15 किलो वजन वाढवले आहे. या सिनेमातून संजय दत्तचा खासगी आणि वादग्रस्त गोष्टींचा उलगडा होईल. यामध्ये संजय दत्त ड्रग्सच्या आहारी गेल्याचाही उल्लेख असल्याचे समजते. काही दिवसांपूर्वीच स्वतः संजय दत्तने खुलासा केला, की एकेकाळी तो ड्रग्सच्या प्रचंड आहारी गेला होता. आज अनेकांना लक्षात नसेल 1981 मध्ये संजय दत्तचा पहिला चित्रपट 'रॉकी' रिलीज झाला होता. तेव्हा तो 22 वर्षांचा होता. त्यानंतर 1982 मध्ये 'विधाता' सुपरहिट ठरला. एकीकडे करिअरची शानदार सुरुवात होत असताना दुसरीकडे संजय ड्रग्सच्या विळख्यात अडकला होता. एवढेच नाही 82 मध्ये तो ड्रग्स सोबत बाळगण्याच्या आरोपात पकडल्या गेल्या आमि 5 महिने तुरुंगात होता. तेव्हा संजयचे वडील अभिनेते सुनील दत्त यांच्यासाठी तो अतिशय कठीण काळ ठरला होता. संजय ड्रग्सच्या व्यसनापासून दूर व्हावा यासाठी त्यांनी अमेरिकेतील रिहॅब सेंटरमध्ये त्याची ट्रिटमेंट करवून घेतली होती. त्यानंतर तीन वर्षांनी म्हणजे 1985 नंतर तो 'जान की बाजी' चित्रपटाद्वारे इंडस्ट्रीत परतला होता. 
 
अनेक सेलेब्स अडकले ड्रग्सच्या विळख्यात...
- ड्रग्सच्या विळख्यात अडकणारा संजय दत्त हा काही बॉलिवूडमधील एकमेव सेलिब्रिटी नाही. यापैकीच एक होती गीतांजली नागपाल. 90 चे दशक कोणाला लक्षात असेल तर तेव्हाची प्रसिद्ध मॉडेल गीतांजली नागपाल त्यांना नक्की आठवत असणार. सुष्मिता सेन सारख्या प्रसिद्ध मॉडेल बरोबर ती रॅम्पवर कॅटवॉक करायची. गीतांजली जवेढी प्रसिद्ध मॉडल होती त्यापेक्षाही तिच्या बदनामीचे किस्से अधिक होते. गीतांजली देखिल ड्रग्स अॅडिक्ट होती. ड्रग्ससाठी तिने काय केले नाही, त्यासाठी ती एवढी वेडी झाली होती की तिने कित्येकांसोबत रात्र देखिल घालवली होती. शेवटच्या दिवसांमध्ये गीतांजली दिल्लीतील रस्त्यांवर भीक मागताना दिसली होती.
 
पुढील स्लाइडमध्ये वाचा अशाच काही सेलेब्सबद्दल, जे ड्रग्ज अॅडिक्ट होते...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsappआणि Facebookच्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URLम्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...