आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन मुलांची आई आहे ही अॅक्ट्रेस, दुबईच्या बिझनेसमनसोबत थाटले लग्न

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पती पीटर हॅग आणि जुळ्या मुलांसोबत सेलिना जेटली - Divya Marathi
पती पीटर हॅग आणि जुळ्या मुलांसोबत सेलिना जेटली

इंदुरः टीव्ही इंडस्ट्री असो वा बॉलिवूड, मध्यप्रदेशाने या दोन्ही इंडस्ट्रीला अनेक स्टार्स दिले आहेत. या स्टार्समध्ये अनेक बड्या नावांचा समावेश आहे. यापैकीच एक नाव म्हणजे अभिनेत्री सेलिना जेटली. सेलिनाचे मुळची इंदुरजवळच्या महूची आहे. divyamarathi.comच्या 'Stars Of MP' या सीरिजमध्ये आज तुम्हाला महूच्या कँट एरियात राहणा-या सेलिना जेटलीविषयी सांगत आहे. लग्नानंतर सेलिना दुबईत स्थायिक झाली असून ती जुळ्या मुलांची आई आहे.
तब्बल 13 शाळांमध्ये झाले शिक्षण
सेलिनाचा जन्म 24 नोव्हेंबर 1981 रोजी शिमल्यात झाला. तिचे वडील वीके जेटली इंडियन आर्मीत कर्नल होते. तर आई मीता सायकॉलॉजिस्ट आणि अफगानिस्तानच्या मुळ रहिवाशी आहेत. सेलिनाला एक भाऊ असून तोदेखील इंडियन आर्मीच्या स्पेशल फोर्सेसमध्ये काम करतोय आर्मी कुटुंबातील असल्यामुळे सेलिनाचे बालपण वेगवेगळ्या शहरांत गेले. तिने लखनऊच्या माँटेसरी स्कूलमधून प्राथमिक शिक्षण घेतले. सेलिनाचे कुटुंब काश्मिर आणि कोलकातामध्ये अधिक काळ राहिले. त्यानंतर महूच्या आर्मी एरियात ते कायमचे सेटल झाले. याकाळात वेगवेगळ्या 13 शाळांमध्ये सेलिनाचे शिक्षण झाले. तिने कनोसा कॉन्व्हेंट (रानीखेत), आर्मी पब्लिक स्कूल (उधमपूर), सिटी माँटेसरी स्कूल (लखनऊ) आणि केंद्रिय विद्यालयातून शिक्षण पूर्ण केले.
आपल्या वडील आणि भावाप्रमाणे सेलिनाचीही आर्मीत जाण्याची इच्छा होती. आर्मीत डॉक्टर किंवा पायलट होण्याची तिची इच्छा होती. मात्र वयाच्या 16 व्या वर्षी तिने शिक्षणासोबतच मॉडेलिंगला सुरुवात केली. 2001 मध्ये मिस इंडियाचा किताब आपल्या नावी केल्यानंतर ती मिस युनिव्हर्स स्पर्धेत रनरअप ठरली.
दुबईतील बिझनेसमनसोबत थाटले लग्न
सेलिनाचे लग्न 23 जुलै 2011 रोजी दुबईतील बिझनेसमन पीटर हॅगसोबत झाले. सेलिना आणि पीटर जुळ्या मुलांचे पालक आहेत. त्यांच्या मुलांची नावे विस्टन आणि विराज आहेत. सेलिनाने आपल्या मुलाच्या जन्मानंतर त्यांचे ट्विटर पेज तयार केले असून त्यांचे 500 फॉलोअर्स आहेत.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, सेलिनाच्या कुटुंबाची ही खास छायाचित्रे...