आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वयाची चाळीशी ओलांडल्यानंतरही एवढी ग्लॅमरस दिसते ही 'चक दे गर्ल', शेअर केले लेटेस्ट Photos

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः बॉलिवूडमध्ये स्वतःचा वेगळा ठसा निर्माण करणारी मराठमोळी विद्या माळवदे सध्या सिनेमांपासून दूर पण सोशल मीडियावर अॅक्टिव आहे. अलीकडेच विद्याने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर  स्वतःची बोल्ड छायाचित्रे शेअर केली आहेत. यामध्ये तिचा ग्लॅमरस लूक लक्ष वेधून घेतोय. वयाची 44 वर्षे पूर्ण करणा-या विद्याच्या गॉर्जिअस लूकचे रहस्य मेडिटेशन आहे. ती नेहमीच तिच्या सोशल अकाऊंटवर मेडिटेशन पोजमधील फोटोज पोस्ट करत असते. विद्या मेडिटेशनला दैनंदिन आयुष्यातील अविभाज्य भाग समजते आणि कधीही ते मिस करत नाही.

 'रामजी लंडनवाले' या सिनेमाच्या दिग्दर्शकासोबत थाटला दुसरा संसार... 
- विद्याने लॉचे शिक्षण घेतले आहे. सिनेसृष्टीत पदार्पण करण्यापूर्वी विद्या एअर होस्टेस होती. याच काळात तिने कॅप्टन अरविंद सिंह बग्गासोबत लग्न केले. 
- लग्नाच्यावेळी विद्या 19 वर्षांची होती. तिचा हा संसार फार काळ टिकू शकला नाही. 2000मध्ये एका प्लेन क्रॅशमध्ये अरविंद यांचा मृत्यू झाला. 
- पतीच्या निधनानंतर जवळजवळ आठ वर्षे विद्या एकटीच होती. 2009मध्ये तिने संजय डायमासोबत लग्न केले. संजय फिल्म इंडस्ट्रीत कार्यरत असून 'लगान' या सिनेमासाठी त्यांनी स्क्रिनप्ले रायटर आणि असोसिएट डायरेक्टर म्हणून काम केले आहे.   
- संजय यांनी 2005 मध्ये 'रामजी लंडनवाले' हा सिनेमा दिग्दर्शित केला होता. 
- 2 मार्च 1973 रोजी मुंबईत विद्याचा जन्म झाला. लॉचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर विद्याने एअर होस्टेसच्या रुपात करिअरला सुरुवात केली होती. मात्र नशिबाने ती बॉलिवूडमध्ये आली आणि एअरहोस्टेसहून अभिनेत्री बनली.
 
फिल्मी करिअरची सुरुवात...
विद्याने आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात 2003 मध्ये विक्रम भट यांच्या 'इंतेहा' या सिनेमाद्वारे केली होती. मात्र हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. त्यानंतर तिने आपला मोर्चा जाहिरातींकडे वळवला. 2007 मध्ये आलेल्या चक दे इंडिया या सिनेमातून तिला ओळख प्राप्त झाली. या सिनेमात तिने गोलकिपरची भूमिका वठवली होती. 
 
या सिनेमांमध्ये केलंय विद्याने काम...
- विद्याने 2007 मध्ये आलेल्या 'चक दे इंडिया'नंतर 'किडनॅप' या सिनेमात मिनिषा लांबाच्या आईची भूमिका वठवली होती. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर फारसा चालला नव्हता.  
- विद्याने हॉरर फिल्म '1920: द इविल रिटर्न्स'मध्ये आफताब शिवदासानीच्या बहिणीची भूमिका वठवली होती. 
- विद्याने लीड आणि साइड रोलसोबत 'वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई दुबारा' सिनेमात कॅमियो केला होता.  
- सिनेमांसोबतच विद्याने टीव्हीवर 'फॅमिली नंबर 1', 'खतरों के खिलाडी', 'फिअर फॅक्टर'  आणि 'डर सबको लगता है' या शोजमध्ये काम केलंय.  
 
पुढील स्लाईड्समध्ये बघा, विद्याने शेअर केलेले तिचे लेटेस्ट PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...