आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Walk Down The Memory Lane And Celebrate #21YearsOfKaranArjun

पडद्यामागील: सलमान-काजोल नव्हे अजय देवगण-जुही चावलाला ऑफर झाला होता \'करन अर्जुन\'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- ब्लॉकबस्टर 'करन अर्जुन' सिनेमाच्या रिलीजला नुकतीच 21 वर्षे पूर्ण झाली आहेत. 13 जानेवारी 1995 रोजी हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर दाखल झाला होता. राकेश रोशन यांनी दिग्दर्शित हा सिनेमा दमदार संवादांसाठी आणि भावांमधील दर्शविण्यात आलेल्या प्रेमासाठी ओळखला जातो. रिलीजच्या 21 वर्षांनंतरसुद्धा या सिनेमाची क्रेझ मुळीच कमी झालेली नाही.
पुनर्जन्मावर आधारित या सिनेमात वडिलांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी पुनर्जन्म घेणाऱ्या दोन भावांची कथा दर्शविण्यात आली आहे. या सिनेमात मुख्य भूमिकेत शाहरुख खान आणि सलमान खान यांनी काम केले. यांच्या अपोझिट काजोल आणि ममता कुलकर्णी दिसल्या होत्या. राखी, रंजीत, अमरिश पुरी यांच्यादेखील महत्त्वपूर्ण भूमिका या सिनेमात होत्या.
या सिनेमाच्या रिलीजला 21 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आम्ही तुम्हाला या सिनेमाशी निगडीत खास पडद्यामागील गोष्टी सांगत आहोत.