आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • These HOT And BOLD Pictures Of Krushna Abhishek\'s Wife Kashmira Shah Will Leave You Grasping For More!

कश्मिरा इज बॅक, शॉर्ट फिल्मसाठी केले HOT अँड BOLD फोटोशूट, बघा Pics

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टरटेन्मेंट डेस्कः कॉमेडिअन कृष्णा अभिषेकची पत्नी आणि अभिनेत्री कश्मिरा शाह ब-याच दिवसांनी चर्चेत आली आहे. यावेळी कश्मिरा आपल्या एका बोल्ड फोटोशूटमुळे लाइमलाइटमध्ये असून तिने आपल्या आगामी एका शॉर्टफिल्मसाठी हे फोटोशूट केले आहे. खरं तर कश्मिरा पुर्वीपासूनच आपल्या बोल्ड अंदाजासाठी ओळखले जाते. आता कमॅक करण्यासाठीसुद्धा तिने आपला पुन्हा एकदो बोल्ड आणि हॉट अंदाज दाखवला आहे. गेल्या काही दिवसांपासून ती मोठ्या पडद्यापासून गायब होती. आता 'कम बॅक टू मी' या शॉर्ट फिल्मच्या माध्यमातून ती पडद्यावर पुनरागमन करत आहे.

विशेष म्हणजे या शॉर्ट फिल्ममध्ये ती केवळ अभिनयच करणार नाही तर या फिल्ममधून ती दिग्दर्शिका म्हणूनही जेब्यू करत आहे. या फिल्मच्या प्रमोशनसाठीच तिने हे बोल्ड फोटोशूट केले आहे. या फोटोशूटविषयी कश्मिरा म्हणाली, "मी गेल्या काही दिवसांपासून फिल्म इंडस्ट्रीत अॅक्टिव नव्हते. मध्यल्या काळात माझे वजनसुद्धा खूप वाढले होते. खरं सांगायचे तर हा ब्रेक मी एन्जॉय केला. कारण मी खूप खात होते आणि व्यायामसुद्धा करावा लागलत नव्हता. हा माझ्यासाठी छोटा ब्रेक होता."
कश्मिरा पुढे म्हणाली, "आता मात्र मी माझ्या सेक्सी लूकसोबत कमबॅक करत आहे. सध्या माझा बराच वेळ जीममध्ये जातोय." कश्मिराने आपल्या अनुभव शेअर करताना सांगितले, "दिग्दर्शिका म्हणून हा माझा पहिला सिनेमा आहे. या सिनेमापासून मला बरेच काही शिकायला मिळाले. ही एक थ्रिलर फिल्म असून प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळतो, हे जाणून घेण्यास मी उत्सुक आहे. ही शॉर्ट फिल्म केल्यानंतर दिग्दर्शकाचे काम किती वेगळे असते, हे मला समजले. माझे काम लोकांना पसंत पडेल आणि ते माझे कौतुक करतील, अशी आशा करते."
या फोटोशूटवेळी कश्मिराचा नवरा कृष्णा अभिषेकसुद्धा उपस्थित होता. आपल्या पत्नीला सेक्सी लूकमध्ये बघून तो तिचे कौतुक करण्याचा मोह आवरु शकला नाही. तो म्हणाला, "कश्मिरा सुरुवातीपासूनच बोल्ड आणि बिनधास्त आहे. तिचा हाच अंदाज मला आवडतो. तो एक प्रामाणिक व्यक्ती आहे. ती ज्याप्रकारे स्वतःला ठेवते, ते मला खूप आवडतं. या सिनेमासाठी तिने खूप मेहनत घेतली असून माझ्या शुभेच्छा तिच्यासोबत आहेत."

या शॉर्टफिल्मसोबतच कश्मिराने आणखी एक सिनेमा दिग्दर्शित केला असून त्याचे नाव कास्टिंग काऊच आहे. या सिनेमातून ती बॉलिवूडमधील कटू सत्य पडद्यावर साकारणार आहे.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन बघा, कश्मिराच्या बोल्ड फोटोशूटची खास झलक...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...