आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लग्नाच्या 16 वर्षांनी पहिल्या पत्नीपासून विभक्त झाला आमिर, यांचाही घटस्फोटावर झाला अंत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट अशी ओळख असलेला अभिनेता आमिर खानने नुकताच आपला 51 वा वाढदिवस साजरा केला. सिनेमांसोबतच आमिर आपल्या खासगी आयुष्यामुळेही नेहमी चर्चेत असतो. दोन लग्ने आणि तीन मुले असे आमिरचे वैवाहिक आयुष्य आहे. प्रसिद्धीझोतात येण्यापूर्वीच आमिरने घराशेजारी राहणा-या रीना दत्ता नावाच्या तरुणीशी पळून जाऊन लग्न थाटले होते. लग्नानंतर जुनैद आणि इरा या दोन लेकरांचा आमिर वडील झाला. मात्र लग्नाच्या 16 वर्षांनी आमिरने रीनापासून कायदेशीररित्या घटस्फोट घेतला आणि किरण रावसोबत दुसरा संसार थाटला. आता आमिर आणि किरणला एक मुलगा आहे. आमिर आणि रीनाने सामंजस्याने विभक्त होण्याचा निर्णय घेतला होता.
विशेष म्हणजे घटस्फोटानंतरसुद्धा आमिर आणि रीनाचे मैत्रीचे संबंध असून रीना आमिरच्या घरच्या प्रत्येक फंक्शन्समध्ये सहभागी होताना दिसते. सोमवारी (14 मार्च) झालेल्या आमिरच्या बर्थडे पार्टीतसुद्धा रीना सहभागी झाली होती.
आमिर आणि रीना यांच्याप्रमाणेच बॉलिवूडमध्ये असे अनेक प्रसिद्ध सेलिब्रिटी आहेत, ज्यांनी घटस्फोट घेऊन आपल्या जोडीदारापासून विभक्त होणे पसंत केले. यामध्ये अनेक नावाजलेल्या सेलिब्रिटी कपल्सचा समावेश आहे.

कोणते आहेत हे सेलिब्रिटी ज्यांच्या लग्नाचा अंत घटस्फोटावर झालाय, जाणून घ्या पुढील स्लाईड्समध्ये...
बातम्या आणखी आहेत...