आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • From Condoms To Alcohol: Check Out Top Controversial Indian Ads Of All Time

जीन्सपासून ते कंडोमपर्यंत : या आहेत सर्वात वादग्रस्त आणि अश्लील जाहिराती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
[छायाचित्रेः (डावीकडे वर) कंडोमच्या जाहिरातीत रणवीर सिंह, टफ शूजच्या जाहिरातीत मिलींद सोमन आणि मधु सप्रे (डावीकडे खाली), कल्याण ज्वेलर्सच्या जाहिरातीत ऐश्वर्या राय बच्चन (उजवीकडे)]
कल्याण ज्वेलर्सच्या एका जाहिरातीवरुन अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन हिच्यावर टीकेचे झोड उठले आङे. या जाहिरातीमुळे तिला जोरदार विरोधाचा सामना करावा लागत आहे. या जाहिरातीच्या माध्यमातून वर्णद्वेष आणि बालमजुरीला प्रोत्साहन दिल्याचा आरोप तिच्यावर आहे. कल्याण ज्वेलर्सच्या या जाहिरातीत एक कृष्णवर्णीय मुलगा ऐश्वर्याच्या मागे छत्री घेऊन उभा आहे, ज्याचा अनेक सामाजिक कार्यकर्ते विरोध करत आहेत. पण ऐश्वर्याच्या दाव्यानुसार कंपनीने या जाहिरातीतील फोटो बदलला आहे. कल्याण ज्वेलर्सची ही जाहिरात 17 एप्रिल रोजी वृत्तपत्रात झळकली होती. 41 वर्षीय अभिनेत्री कल्याण ज्वेलर्सची ब्रॅण्ड अॅम्बेसेडर आहे.
एखादी जाहिरात वादात अडकण्याची ही पहिली वेळ नाहीये. यापूर्वीही भारतात अशा अनेक जाहिराती आहेत, ज्या प्रकाशित झाल्यानंतर त्याच्यावर बरीच टीका झाली होती. काही जाहिरातींवर तर बंदीसुद्धा घालण्यात आली. त्यांचा संकल्प आणि शुट इतके भडक होते, की त्यांच्यावर बंदी घालावी लागली.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून वाचा सर्वात जास्त वादात अडकलेल्या जाहिरातींविषयी...