आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुंबईच्या रस्त्यांवर भल्या पहाटे शाहरुख-सलमानने चालवली सायकल, आर्यन होता सोबत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः शाहरुख खान आणि सलमान खान यांचा दोस्ताना अंदाज शुक्रवारी पहाटे वांद्र्याच्या रस्त्यांवर बघायला मिळाला. दोन्ही सुपरस्टर्सनी शुक्रवारी पहाटे साडे पाच वाजता सायकलिंगची मजा लुटली. हा फोटो ट्विटरवर पोस्ट करुन शाहरुखने लिहिले, "Bhai bhai on bike bike. No pollution…bhai says “Michael Lal Cylcle Lal.”

विशेष म्हणजे शाहरुखचा मुलगा आर्यनसुद्धा यावेळी सायकलिंग करताना दिसला. सलमानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटपासून या तिघांनी सायकलिंगला सुरुवात केली. सायकलिंग करताना सलमान आमिर खानचे ''पापा कहते है...'' हे गाणे गुणगुणत होता. यावेळी सलमानने फोटोग्राफर्सना पोज देत त्यांच्याशी गप्पाही मारल्या. सलमानने शाहरुखला फोटोग्राफर्सना पोज द्यायलाही सांगितले.
गॅलेक्सी अपार्टमेंटपासून सायकलिंग करत हे सगळेजण शाहरुखच्या मन्नत बंगल्यावर पोहोचले, तेथून सलमान कारने आपल्या घरी परतला. यावेळी सलमानचे बॉडीगार्ड्स त्यांच्यासोबत हजर होते.

जेव्हा सलमानने केले शाहरुखचे कौतुक
अलीकडेच यशराज फिल्म्सने सलमान खानच्या आगामी सुल्तान या सिनेमाचा नवा डायलॉग प्रोमो रिलीज केला आहे. यामध्ये तो शाहरुखचे कौतुक करताना दिसतोय. जेव्हा आरफा (अनुष्का शर्मा)ची छेड काढणा-या सुल्तान (सलमान खान) ला कोच म्हणतो, "खुद को शाहरुख खान समझे हे के?" याचे उत्तर देताना सुल्तान म्हणतो - "शाहरुख खान का मजाक मत उड़ाओ, मने बहुत पसंद है। जब वो लड़की की आंख में आंख डालके देखे हे न, तो अंधी लड़की भी पट जावे हे।"
अली अब्बार जफर दिग्दर्शित सुल्तान हा सिनेमा येत्या 6 जुलै रोजी रिलीज होतोय.
पुढील स्लाईडमध्ये बघा, सायकलिंगची मजा घेतानाचे स्टार्सचे Photos...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...