आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॉलिवूड एन्ट्रीपूर्वी अशी दिसायची दीपिका पदुकोण, बघा Photos

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई: बॉलिवूड अॅक्ट्रेस दीपिका पदुकोण लवकरच वयाची 31 वर्षे पूर्ण करणार आहे.  5 जानेवारी, 1986 रोजी तिचा जन्म डेन्मार्कच्या कोपेनहेगन शहरात झाला.  दीपिका ही इंटरनॅशनल बॅडमिंटन प्लेअर प्रकाश पदुकोण यांची मुलगी आहे. दीपिकाची आई उजाला या ट्रॅवल एजंट आणि धाकटी बहीण अनिशा गोल्फर आहे. दीपिका एक वर्षाची असताना तिचे आईवडील बंगळुरुमध्ये सिफ्ट झाले होते. 

शिक्षण सोडून वळली मॉडलिंगकडे...  
बंगळूरच्या सोफिया हायस्कूलमधून शालेय शिक्षण आणि माऊंट कार्मल कॉलेजमधून दीपिकाने प्री-यूनिव्हर्सिटी एज्युकेशन पूर्ण केले. त्यानंतर दीपिकाने बीए (सोशिओलॉजीध्ये) करण्याच्या उद्देशाने इंदिरा गांधी नॅशनल ओपन यूनिव्हर्सिटीमध्ये प्रवेश घेतला. मात्र शिक्षण अर्ध्यावर सोडून ती मॉडेलिंग क्षेत्राकडे वळली.  खरं तर वयाच्या 8 व्या वर्षीच दीपिकाने अनेक जाहिरातींमध्ये काम केले होते. टीन-एजमध्ये ती लिरिल आणि क्लोज-अपसह अनेक ब्रॅण्ड्सच्या जाहिरातीत झळकली.  हिमेश रेशमियाच्या 'नाम है तेरा..' या अल्बममध्येही दीपिका झळकली. 

'ओम शांति ओम'मधून मिळाला मोठा ब्रेक... 
2006 मध्ये दीपिकाने कन्नड फिल्म 'ऐश्वर्या'द्वारे रुपेरी पडद्यावर एन्ट्री घेतली. हा सिनेमा हिट ठरला. या सिनेमाच्या रिलीजनंतर वर्षभराने दीपिकाला शाहरुख खानच्या अपोजिट 'ओम शांति ओम' या सिनेमाद्वारे मोठा ब्रेक मिळाला. 'कॉकटेल', 'ये जवानी है दीवानी', 'चेन्नई एक्ट्रेस', 'गोलियों की रासलीला-रामलीला', 'हॅपी न्यू ईयर', 'पीकू', 'तमाशा' 'बाजीराव मस्तानी' या सिनेमांमध्ये उत्कृष्ट परफॉर्मन्स देऊन दीपिका प्रेक्षकांची आवडती अभिनेत्री बनली. आता ती संजय लीला भन्साळींच्या 'पद्मावती' या सिनेमाच्या शूटिंगमध्ये बिझी आहे. या सिनेमात शाहिद कपूर आणि रणवीर सिंह तिच्यासोबत मेन लीडमध्ये आहेत.  

2017 मध्ये करणार हॉलिवूड डेब्यू...
बॉलिवूडमध्ये स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केल्यानंतर दीपिकाने आपला मोर्चा आता हॉलिवूडकडे वळवला आहे. विन डीजलसोबत 'XXX : द रिटर्न ऑफ जेंडर केज' या हॉलिवूड सिनेमात दीपिका झळकणारेय. अमेरिकन डायरेक्टर डीजे करुसोंचा हा अॅक्शन सिनेमा भारतात 14 जानेवारी रोजी रिलीज होतोय.  

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि बघा, बॉलिवूडमधील पदार्पणापूर्वी कशी दिसायची दीपिका... 
बातम्या आणखी आहेत...