आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकेकाळी लोक 'काली-कलूटी' म्हणून चिडवायचे, बघा प्रियांकाचे Unseen Photos

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अभिनेत्री प्रियांका चोप्राने भारतच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवर नाव कमावले आहे. ती लहान असताना लोक तिला 'काली-कलूटी' म्हणून चिडवत होते. परंतु आज तीच सावळी तरुणी जगात तिच्या सौंदर्यासाठी ओळखली जाते. बालपणी प्रियांका खूप सावळी होती म्हणून तिला सर्वजण चिडवत होते. आज तिची एक झलक पाहण्यासाठी प्रत्येकजण उत्सूक असतो. तिला आपल्या आई-वडिलांचा पाठिंबा मिळाला नसता तर ते ती आज इंडस्ट्रीमध्ये येऊच शकली नसती.

टॉयलेटमध्ये बसून खात होती चिप्स
झारखंडच्या जमशेदपूरमध्ये जन्मलेली प्रियांका चोप्रा अर्थातच पीसी 13 वर्षांची असताना बोस्टनला शिक्षण घेण्यासाठी गेली होती. या अनुभवाविषयी प्रियांका सांगते, 'वयाच्या जवळपास 13व्या वर्षी यूएसमध्ये जाणे माझ्यासाठी एक कल्चर शॉक होता. मी कधीच कॅफेटेरियामध्ये जात नव्हते. कारण मला माहित नव्हते, की रांगेत कसे उभे राहिले जाते आणि पैसे कसे भरले जातात. वाढलेले जेवण कसे खावे हेदेखील मला माहित नव्हते. मला स्वत: मुर्ख ठरवून घ्यायचे नव्हते. म्हणून मी वेडिंग मशीनवरून चिप्स खरेदी करत होते आणि बाथरुममध्ये जाऊन खात होते. मी तेथे माझे तीन वर्षे असेच घालवले.'

आईच्या एका निर्णयाने बदलले आयुष्य
पीसी जेव्हा परदेशातून परतली तेव्हा तिची काकू तिला 'काली कलूटी' म्हणून चिडवत होती. कोणत्याही सामान्य मुलांप्रमाणे प्रियांकाचा आत्मविश्वास कमी व्हायला लागला होता. दुसरीकडे तिचे वडील तिला पुढच्या शिक्षणासाठी ऑस्ट्रेलियाला पाठवण्याची तयारी करत होते. त्यावेळीच प्रियांकाच्या आईने असे पाऊल उचलले, ज्यामुळे तिचे आयुष्यच बदलले. प्रियांकाने ज्या विद्यापाठीमध्ये शिक्षण घेण्यासाठी तिने पासपोर्स साइज फोटो काढला होता, तोच फोटो तिच्या आईने मिस इंडिया स्पर्धेत पाठवला. तिच्या आईने याविषयी कुणालाच काही सांगितले नव्हते.

एकेदिवशी त्या स्पर्धेसाठी प्रियांकाची निवड झाल्याचा फोन आला आणि तेव्हा सर्वांना काय घडले ते कळाले. प्रियांकाने स्पर्धेत दुसरे स्थान पटकावले. त्याचवर्षी प्रियांकाने मिस वर्ल्डचा किताब जिंकला. त्यानंतर ती सिनेमांकडे वळाली. इंडस्ट्रीमध्ये आल्यानंतर तिला काही वर्षातच राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. प्रियांकाने 'मेरी कॉम', 'बर्फी', 'फॅशन', डॉन सीरीज, 'कमीने', 'ऐतराज'सारख्या सिनेमांत काम केले.

पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा प्रियांका चोप्राचे Unseen Photos 
बातम्या आणखी आहेत...