आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

10 वर्षांत बदलाल 'चीनी कम'च्या 'सेक्सी'चा लूक, आता दिसतेय अतिशय ग्लॅमरस

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
2007 साली आलेल्या 'चीनी कम' या सिनेमात अमिताभ जिला सेक्सी म्हणून हाक मारायचे ती बालकलाकार तुम्हाला आठवतेय का... 'चिनी कम'मधील 'सेक्सी' अर्थातच स्वीनी खरा आता मोठी झाली आहे. या 10 वर्षांत तिच्या लूकमध्ये बराच चेंज बघायला मिळतोय. या सिनेमात तिने कॅन्सर पेशंटची भूमिका साकारली होती. सिनेमात तिची अमिताभ बच्चन यांच्यासोबतची केमिस्ट्री छान जुळली होती. स्वीनीने हा सिनेमा केला तेव्हा ती 9 वर्षांची होती. आता तिने वयाची 18 वर्षे पूर्ण केली आहेत. 

इन्स्टाग्रामवर शेअर करते फोटोज...
नरसी मोंजी कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनोमिक्समध्ये शिकणा-या स्वीनीने बॉलिवूड, हॉलिवूड सिनेमांसोबतच टीव्ही मालिकांमध्ये अभिनय केला आहे. 'बा, बहू और बेबी' (2005-2010) या मालिकेसाठी तिला ओळखले जाते. याशिवाय तिने 'दिल मिल गए' (2007- 2010) या मालिकेतदेखील काम केले आहे. 2005 साली आलेल्या 'आफ्टर द वेडिंग' या हॉलिवूड सिनेमात ती झळकली आहे. स्वीनीने 'परिणीता' (2005), 'एलान' (2005), 'सियासत' (2006), 'हॅरी पॉटर' (2008), 'पाठशाला' (2010), 'कालो' (2010), 'एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी' (2016) सह ब-याच सिनेमांमध्ये अभिनय केला आहे. इन्स्टाग्रामवर स्वीनी अॅक्टिव असून स्वतःची छायाचित्रे ती नित्यनेमाने शेअर करत असते.  

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि बघा, स्वीनीचे 7 फोटोज...
बातम्या आणखी आहेत...