आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

10 वर्षांत एवढी बदलली 'चीनी कम'मधील सेक्सी, पाहा आता कशी दिसतेय

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'चीनी कम' चित्रपटातील चाइल्ड आर्टिस्टची भूमिका करणारी स्वीनी खरा आता मोठी झाली आहे. - Divya Marathi
'चीनी कम' चित्रपटातील चाइल्ड आर्टिस्टची भूमिका करणारी स्वीनी खरा आता मोठी झाली आहे.
एंटरटेनमेंट डेस्क - तुम्हाला 2007 मध्ये आलेला 'चीनी कम' चित्रपट नक्कीच आठवत असेल. या चित्रपटात अमिताभ बच्चन ज्या चिमुकलीला 'सेक्सी' म्हणायचे तीच 'सेक्सी' म्हणजे स्विनी आता खरंच मोठी झाली आहे. गेल्या 10 वर्षांत तिचा लूकही बराच बदलला आहे. या चित्रपटात स्विनीने एका कॅन्सर पेशंटची भूमिका केली होती. चित्रपटात तिची अमिताभ बच्चन बरोबर चांगली केमिस्ट्री दाखवण्यात आली होती. स्विनीने जेव्हा या चित्रपटात भूमिका केली त्यावेळी तिचे वय 9 वर्ष होते. आता ती 18 वर्षांची आहे. 

इन्स्टाग्रामवर शेअर करते PHOTO 
नरसी मोंजी कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनोमिक्समध्ये शिकणारी स्विनीने बॉलिवूड, हॉलिवूड चित्रपटांबरोबरच टिव्ही सिरियल्मध्येही काम केले आहे. टिव्ही शो 'बा, बहू और बेबी' (2005-2010) साठी तिला खास ओळखले जाते. त्याशिवाय तिने 'दिल मिल गए' (2007- 2010) सिरियलमध्येही काम केले आहे. 2005 मध्ये आलेल्या 'आफ्टर द वेडिंग' या हॉलिवूड सिनेमातही तिने काम केले आहे. तर 'परिणीता' (2005), 'एलान' (2005), 'सियासत' (2006), 'हॅरी पॉटर' (2008), 'पाठशाला' (2010), 'कालो' (2010), 'एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी' (2016) सह अनेक चित्रपटांत तिने भूमिका केल्या आहेत. इनस्टाग्रावर ती भरपूर फोटो पोस्ट करत असते. 
 
पुढील स्लाइड्सवर पाहा स्विनीचे काही PHOTOS.. 
 
बातम्या आणखी आहेत...