आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बालपणी अशी दिसायची दीपिका, वयाच्या 8व्या वर्षी मिळाली होती पहिली जाहिरात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वडील प्रकाश यांच्यासोबत दीपिका पादुकोण - Divya Marathi
वडील प्रकाश यांच्यासोबत दीपिका पादुकोण
मुंबई- बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण येत्या 5 जानेवारीला 30 वर्षांची होणार आहे. 5 जानेवारी 1986ला डेन्मार्कच्या कोपेनहेगनमध्ये जन्मलेली दीपिका इंटरनॅशनल बॅडमिंटन खेळाडू राहिलेले प्रकाश पदुकोण यांची मुलगी आहे. तिची आई उजाला ट्रॅव्हल एजेंट तर धाकटी बहीण अनिशा गोल्फर आहे.
शिक्षण सोडून आली मॉडेलिंगमध्ये...
बंगळुरुच्या सोफीया हायस्कूलमधून शालेय शिक्षण आणि माऊंट कार्मल कॉलेजमधून दीपिकाने प्री-यूनिव्हर्सिटी एज्युकेशन पूर्ण केले. त्यानंतर दीपिकाने सोशियोलॉजीमध्ये बीए करण्यासाठी इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठामध्ये प्रवेश घेतला. परंतु शिक्षण अर्ध्यात सोडून ती मॉडेलिंगकडे वळाली. तिने वयाच्या 8व्या वर्षीच अनेक जाहिरातीत काम केले. टीन-एजमध्ये तिने लिरिल आणि क्लोज-अपसारख्या ब्रँडसाठी जाहिराती केल्या. ती हिमेश रेश्मियाच्या 'नाम है तेरा...' या अल्बममध्ये दिसली होती.
'ओम शांती ओम'मधून मिळाला ब्रेक-
2006मध्ये दीपिकाने 'ऐश्वर्या' या कन्नडी सिनेमात काम केले. या सिनेमाला अपेक्षेप्रमाणे यश मिळाले. त्यानंतर एका वर्षानी अर्थातच 2007मध्ये तिने फराह खानच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या 'ओम शांती ओम' या हिंदी सिनेमातून बॉलिवूडमध्ये एंट्री केली. या सिनेमासाठी दीपिकाला फिल्मफेअर उत्कृष्ट पर्दापणाचा पुरस्कार मिळाला. दीपिकाने आतापर्यंत जवळपास 25 सिनेमांत काम केले. 'कॉकटेल' 'ये जवानी है दीवानी', 'चेन्नई एक्स्प्रेस', 'गोलिया की रासलीला- रामलीला', 'हॅप्पी न्यू ईअर', 'पीकू', 'तमाशा', आणि 'बाजीराव मस्तानी' या सिनेमांत दीपिका उत्कृष्ट अभिनय करून प्रेक्षकांच्या मनात वेगळेच स्थान निर्माण केले आहे. दीपिका 2015मधील सर्वाधिक कमाई करणारी अभिनेत्रीदेखील ठरली आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा दीपिका पदुकोणच्या बालपणी आणि कुटुंबीयांसोबतचे निवडक फोटो...