आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

42 वर्षांचा झाला हृतिक रोशन, हे आहेत त्याच्या बालपणीचे 8 Rare Photos

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो :  आई पिंकीच्या कुशीत हृतिक रोशन, सोबत वडील राकेश रोशन - Divya Marathi
फाइल फोटो : आई पिंकीच्या कुशीत हृतिक रोशन, सोबत वडील राकेश रोशन
बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन आज (10 जानेवारी) 42 वर्षांचा झाला आहे. 10 जानेवारी 1974 रोजी हृतिकचा जन्म मुंबईमध्ये झाला. तो प्रसिध्द निर्माता-दिग्दर्शक राकेश रोशनचा मुलगा आहे. हृतिकने फिल्म इंडस्ट्रीमध्ये आपले निर्माते वडिलांच्यासह सहायक दिग्दर्शकांच्या रुपात कामास सुरुवात केली होती.

2000मध्ये आलेल्या 'कहो ना प्यार है'मधून त्याने मुख्य अभिनेता म्हणून आपल्या अभिनय करिअरला सुरुवात केली. त्यानंतर 'कोई मिल गया', 'क्रिश', 'क्रिश-3'सारख्या सुपरहिट सिनेमांमध्ये त्याने काम केले. या सिनेमांमधून हृतिकने आपली एक वेगळी छाप इंडस्ट्रीमध्ये सोडली.
बालकलाकार म्हणूनही केले काम
फिल्म इंडस्ट्रीमध्ये हृतिक रोशनचा प्रवास बालकलाकाराच्या रुपात सुरु झाला होता. 1980मध्ये बालकार म्हणून त्याने पहिल्यांदा 'आशा'मध्ये काम केले होते. शिवाय, 'आपके दिवाने' (1980), 'आसपास' (1981) आणि 'भगवान दादा' (1986)सारख्या काही सिनेमांमध्येसुध्दा त्याने
बालकलाकार म्हणून काम केले.
हृतिकचे बालपणीचे नाव डुग्गू आहे. त्यावेळी तो कसा दिसत होता, हे पाहण्यासाठी पुढील स्लाइ़ड्सवर क्लिक करा...