आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भेटा B-Townच्या 26 स्टार्सना, ज्यांनी Child Artist च्या रुपात केली करिअरला सुरुवात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्कः सिनेसृष्टीत बालकलाकारांना खूप महत्त्व आहे. येथील अनेक कलाकारांनी बालकलाकाराच्या रुपात आपल्या करिअरला सुरुवात केली. आज हे सर्व कलाकार या ग्लॅमर इंडस्ट्रीतील नावाजलेले चेहरे आहेत. या कलाकारांनी आपल्या अभिनयाने केवळ प्रेक्षकांची मनं जिंकली नाही तर स्वतःचे स्टारडम टिकवून ठेवले. अगदी शशी कपूर यांच्यापासून ते नीतू सिंग, ऋषी कपूर, श्रीदेवी, संजय दत्त, हृतिक रोशन, आमिर खान, उर्मिला मातोंडकर यांच्यासह अनेकांनी आपल्या करिअरची सुरुवात बालकलाकाराच्या रुपात केली आहे. बालपणी आपल्या निरागस अभिनयाने या कलाकारांनी प्रेक्षकांच्या मनावर स्वतःची वेगळी छाप उमटवली. तर तारुण्यात पदार्पण केल्यानंतर हे कलाकार तरुणांच्या गळ्यातील ताईत ठरले.
 
विशेष म्हणजे या कलाकारांसोबतच आजच्या नव्या पिढीच्यासुद्धा अनेक कलाकारांनी आपल्या करिअरची सुरुवात बालकलाकार म्हणून केली. यामध्ये आलिया भटपासून हंसिका मोटवानी, मालविका राज, सना सईद, कुणाल खेमू यांच्यासह अनेकांच्या नावांचा उल्लेख करता येईल. यापैकी काही लीड रोलमध्ये झळकण्याची तयारी करत आहेत, तर काहींनी बड्या बॅनरमधून सिनेसृष्टीत दमदार एन्ट्री घेतली आहे.
 
आज बालदिनाचे औचित्य साधत आम्ही तुम्हाला बॉलिवूड इंडस्ट्रीतील अशा 26 कलाकारांविषयी सांगतोय, ज्यांनी बॉलिवूडमध्ये बालकलाकाराच्या रुपात आपल्या करिअरला सुरुवात केली.  
बातम्या आणखी आहेत...