आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चंकी पांडेची मुलगी या फिल्ममध्ये करणार टायगरसोबत रोमान्स, दिसते एवढी ग्लॅमरस

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः दिग्दर्शक करण जोहरने अलीकडचे 'स्टुडंट ऑफ द इयर 2' या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. त्याने चित्रपटाचे पोस्टर रिलीज केले असून यामध्ये जॅकी श्रॉफ यांचा मुलगा टायगर श्रॉफ मेन लीडमध्ये झळकणार आहे. चित्रपटाच्या पोस्टरवर टायगरचा कूल लूक लक्ष वेधून घेतोय. या चित्रपटातून अभिनेता चंकी पांडेची मुलगी अनन्या पांडे सिनेसृष्टीत पदार्पण करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पण अनन्याचे नाव चित्रपटासाठी जवळजवळ निश्चित झाल्याचे सूत्रांकडून समजते. 

 

- चंकी पांडेची मुलगी अनन्या सोशल मीडियावर बरीच अॅक्टिव आहे. तिने डान्स आणि अॅक्टिंग कोर्स पूर्ण केला आहे. 
- 'स्टुडंट ऑफ द इयर 2'च्या निर्मात्यांनी ज्या अभिनेत्रींच्या नावांचा विचार केला आहे, त्यामध्ये अनन्याचे नाव प्रथम क्रमांकावर आहे. लवकरच तिच्या नावाची अधिकृत घोषणा होऊ शकते.


सलमानच्या सांगण्यावरुन अनन्याने गिरवले अभिनयाचे धडे...
- अनन्या पांडे आता 18 वर्षांची असून सध्या ती तिचे ग्रॅज्युएशन पूर्ण करत आहे. अनन्याला चंकी पांडेचा जवळचा मित्र सलमान खान लाँच करणार असल्याची चर्चा होती. सलमानच्या सांगण्यावरुनच अनन्याने फिटनेस क्लास आणि अॅक्टिंग क्लास लावला होता.

 

शाहरुख खान आणि संजय कपूरच्या मुलींची फ्रेंड आहे अनन्या... 

मुंबईतील धीरुभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमधून अनन्याचे शालेय शिक्षण पूर्ण झाले आहे. संजय कपूरची मुलगी शनाया कपूर आणि शाहरुख खानची मुलगी सुहाना खान या दोघी अनन्याच्या बेस्ट फ्रेंड्स आहेत. या तिघीही एकाच शाळेत शिकल्या. अनन्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर तिचे या दोघींसोबतचे अनेक फोटोज बघायला मिळतात. सलमान खान अनन्याचा मेंटॉर आहे. विशेष म्हणजे अलीकडेच शाहरुखच्या बर्थडे पार्टीत अनन्या सुहाना आणि शनायासोबत अलीबागमध्ये उपस्थित होती.  

 

भावाच्या आहे अधिक जवळ...
अनन्या तिचा चुलत भाऊ अहान पांडेच्या अतिशय जवळ आहे. अहान हा चंकी पांडेच भाऊ चिक्की पांडे यांचा मुलगा आहे. यास्मिन कराचीवाला यांच्याकडून अनन्या फिटनेसचे ट्रेनिंग घेतेय.  

 

जेव्हा फराह खानने अनन्याच्या फोटोवर केले होते कमेंट.. 
नृत्यदिग्दर्शिका फराह खानने अनन्याच्या एका फोटोवर कमेंट केल्यामुळे सध्या अनेकांच्याच भुवया उंचावल्या होत्या. चंकी पांडेच्या पत्नीने म्हणजेच भावना पांडेने अनन्याचा एक फोटो पोस्ट केला होता. या फोटोवर कमेंट करत फराह म्हणाली होती, ‘प्लीज हिची डीएनए टेस्ट करा. चंकी पांडेची मुलगी आणि ती ही इतकी सुंदर….’ फराहने ही कमेंट केल्यामुळे सर्वप्रथम अनेकांच्याच भुवया उंचावल्या होत्या. पण, तिने ही कमेंट विनोदी अंदाजात केली होती. 

 

पुढील स्लाईड्सवर बघा, चंकी पांडेंच्या सुपरस्टायलिश लेकीचे खास PHOTOS... 

बातम्या आणखी आहेत...