आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बक-या चारायचे काम करुन कुटुंबीयांनी शिकवले, संघर्षात गेले या प्रसिद्ध विनोदवीराचे बालपण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चंदीगडः अभिनयाच्या क्षेत्रात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण करणे सोपे काम नाही. विशेषतः अतिशय छोट्या गावातून आलेल्या तरुणांसाठी मायानगरी मुंबईत स्वतःची ओळख निर्माण करणे अतिशय कठीण आहे. प्रसिद्ध विनोदवीर ख्याली सहारण यांनीही अत्यंत हलाखीच्या परिस्थितीचा सामना करत अभिनेता म्हणून इंडस्ट्रीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. ख्याली यांचे बालपण कसे गेले, याचा अंदाज आपण त्यांनी दिलेल्य उत्तरावरुन बांधू शकतो. त्यांनी सांगितले, ''माझ्या गावात पाचवीपर्यंत शाळा होती. दहावीपर्यंतच्या शिक्षणासाठी गावातील सगळ्या मुलांना आठ किलो मीटरची पायपीट करावी लागायची. त्यात मी निराळा नव्हतो.''

कसे होते या विनोदवीराचे बालपण...
- ख्याली यांनी सांगितले, ''कुटुंबीयांनी अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत मला दहावीपर्यंत शिकवले. पैशांसाठी माझे कुटुंबीय बक-या चारायचे काम करायचे. ही परिस्थिती जर बदलायची असेल, तर मलाच काहीतरी करावे लागेल, असे मी ठरवले होते.''
- त्यासाठी वयाच्या सोळाव्या वर्षी गंगानगर (राजस्थान) येथे आलो आणि सहा वर्षे साखर कारखान्यात काम केले. नोकरीसोबतच थिएटरमध्येही काम करु लागलो. सिनेमा आणि स्टेज शोजशिवाय ख्याली आता मोटिवेशनल स्पीकर म्हणूनही काम करतात.
- ते सांगतात, 'मी जगातील सर्वात कमी शिकलेला स्पीकर आहे.'
- कॉलेज, पोलिस आणि डॉक्टर या क्षेत्रांसह वेगवेगळ्या विभागात जाऊन मी मोटिवेशनल स्पीकिंग करतो.
- मी माझ्या आयुष्यातील संघर्षाविषयी लोकांना सांगतो आणि त्यांना सल्ला देतो, की आयुष्यातील प्रत्येक क्षण हा आनंदाने जगा.
- स्वतःला सिद्ध करण्याची एकही संधी हातून दवडू नका.

अपघातानंतर १३ महिने हॉस्पिटलमध्ये होते, मात्र हिंमत हारली नाही
- ख्याली यांनी सांगितले, की साखर कारखान्यात काम करताना त्यांचा डावा हाथ मशीमध्ये आला होता.
- त्यांच्या हातातील तेरा हाडे तुटली होती. त्यासाठी त्यांना तब्बल तेरा महिने रुग्णालयात काढावी लागली होती.
- त्यांच्या हातावर एकुण सात शस्त्रक्रिया झाल्या. गंमतीने ते म्हणतात, अनेक डॉक्टर माझ्या हातावरच शिकले.
- २००० साली चंदीगड येथे आलो. प्लाजामध्ये पाच मिनिटांच्या परफॉर्मन्ससाठी आयोजकांच्या सांगण्यावरुन कार्यक्रमस्थळी मी झाडू मारायचे काम केले आहे.
- कलाकारांना चहा आणून देणे, भांडी घासणे, ही कामेसुद्धा केली. तेव्हा कुठे मला सादरीकरणासाठी पाच मिनिटे मिळायची. आज त्यामुळेच मी बॉलिवूडपर्यंत पोहोचू शकलो.
१६ एकरमध्ये उभारली शाळा
- आयुष्यात पैसे कमावल्यानंतर सर्वप्रथम आपल्या गावात एक शाळा सुरु करायची, हे मी ठरवले होते. एकाच ठिकाणी मुलांना शिक्षण मिळावे, हा त्यामागचा माझा हेतू होता.
- आज माझे हे स्वप्न साकार झाले आहे. त्यांनी राजस्थानच्या हनुमानगड येथे एक बोर्डिंग स्कूल सुरु केले आहे. सोळा एकर परिसरात ही शाळा असून येथे चौथीपासून ते दहावीपर्यंतचे वर्ग आहेत.
- लवकरच येथे बारावीपर्यंतचे वर्ग सुरु करण्यात येणार आहेत.
- ख्याली यांनी टीव्ही, सिनेमे आणि स्टेज शोच्या माध्यमातून पैसे कमावले आहेत.

कोण आहे ख्याली सहारण?
- राजस्थानच्या हनुमानगड जिल्ह्यात एका गरीब कुटुंबात ख्याली यांचा जन्म झाला.
- त्यांचे कुटुंबीय बक-या चारायचे काम करुन उदरनिर्वाह करतात. ख्याली यांनी अँकरिंगच्या माध्यमातून आपल्या करिअरला सुरुवात केली.
- त्यांनी आत्तापर्यंत वीसहून अधिक देशांमध्ये कॉमेडी शोज केले आहेत. शिवाय काही हिंदी सिनेमांमध्येही त्यांनी अभिनय केला आहे.
- बॉम्बे टू गोवा, सिंह इज किंग, मुस्करा के देखे जरा आणि भावनाओं को समझो हे त्यांचे प्रमुख सिनेमे आहेत.

पुढील स्लाईड्समध्ये पाहा, अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून वर आलेल्या ख्याली यांची खास छायाचित्रे...