आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'हेट स्टोरी 3\'च्या पोस्टरवर दिसला बोल्डनेस, पाहा 21 बॉलिवूड फिल्म्सचे सर्वात बोल्ड पोस्टर्स

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हेट स्टोरी 3 च्या पोस्टरवर करण सिंग ग्रोवर, जरीन खान, शर्मन जोशी आणि डेजी शाह - Divya Marathi
हेट स्टोरी 3 च्या पोस्टरवर करण सिंग ग्रोवर, जरीन खान, शर्मन जोशी आणि डेजी शाह

सध्या बॉलिवूड वर्तुळात डेजी शाह आणि जरीन खान स्टारर 'हेट स्टोरी 3' या सिनेमाची सर्वाधिक चर्चा होतेय. या सिनेमात डेजी आणि जरीन यांनी दिलेले बोल्ड सीन्स बघून सगळेच अवाक् झाले आहेत. आत्तापर्यंत रिलीज झालेल्या ट्रेलर आणि साँग्समध्ये दोघीही लाजेच्या मर्यादा ओलांडताना दिसत आहेत. शर्मन जोशी आणि करण सिंग ग्रोवर या अभिनेत्यांसोबत दोघीही इंटीमेट होताना दिसत आहेत. या सिनेमाचा केवळ ट्रेलरच नव्हे तर पोस्टरसुद्धा खूप बोल्ड आहे. पोस्टरवर डेजी आणि जरीन अभिनेत्यांसोबत इंटीमेट होताना दिसत आहेत. त्यामुळे रिलीजपूर्वीच हा सिनेमा चांगलीच चर्चा एकवटत आहे. येत्या 4 डिसेंबरला हा सिनेमा मुव्ही स्क्रिन्सवर दाखल होतोय. आता या बोल्डनेसचा सिनेमाला कितपत फायदा होतो, हे चित्र लवकरच स्पष्ट होईल.
तसे पाहता प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी निर्माते-दिग्दर्शक फार पूर्वीपासून बोल्ड पोस्टर्सची मदत घेत असल्याचे दिसून येते. त्यामुळे अनेकदा वादांनाही तोंड फुटले आहे. ‘3 जी’, ‘हेट स्टोरी’, ‘द डर्टी पिक्चर’, ‘जोड़ी ब्रेकर्स’, ‘जिस्म 2’, ‘मर्डर 2’, ‘साहिब बीवी और गँगस्टर’, ‘काइट्स’, ‘राज’, ‘कुर्बान’, ‘आशिक बनाया आपने’, ‘ब्लड मनी’, ‘द डर्टी बॉलिवूड बॅचलर’, ‘हैलो...कौन है’, ‘हीरोइन’, ‘हिस्स’, ‘इंकार’, ‘जूली’, ‘मरेगा साला’, ‘रागिनी MMS 2’, ‘मर्डर 3’, ‘नशा’, ‘निशब्द’, ‘प्लेयर्स’, ‘प्यार के साइड इफेक्ट्स’, ‘राज 3’, ‘रेड’, ‘कौन है वहां’ यांसारख्या सिनेमांचे पोस्टर्स बरेच बोल्ड बनवण्यात आले होते. काही सिनेमांचा अपवाद वगळता बोल्ड पोस्टर्स सिनेमा हिट करण्यात अयशस्वी ठरले होते.
खरं तर पूर्वीच्या काळी ए ग्रेड सिनेमांचे पोस्टर्स बोल्ड असायचे. मात्र आता बॉलिवूडमधील सामान्य सिनेमांचेही पोस्टर्स बोल्ड दिसू लागले आहेत. या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला अशाच काही बोल्ड पोस्टर असलेल्या सिनेमांविषयी सांगत आहोत.
पुढील स्लाईड्समध्ये जाणून घ्या या बोल्ड पोस्टर्स असलेल्या सिनेमांविषयी..